फास्टॅगची तयारी : टोलनाक्यांवर कॅमेऱ्यांची उभारणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:58 AM2021-02-05T07:58:13+5:302021-02-05T07:58:13+5:30
आज अनेक मोठे रस्ते बांधताना त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी टोलनाके लावून त्यातून जनतेकडून पैसा वसूल केला जातो. त्यामुळे रस्ते चकाचक ...
आज अनेक मोठे रस्ते बांधताना त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी टोलनाके लावून त्यातून जनतेकडून पैसा वसूल केला जातो. त्यामुळे रस्ते चकाचक राहून इंधन बचतीसह पर्यावरण रक्षण होते; परंतु हे सर्व होत असतानाच ज्या रस्त्यांवर टोलनाका आहे, तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असत. त्यामुळे मोठी डोकेदुखी होत असे. ही डोकेदुखी थांबविण्यासह रांगांमधून नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने आता साधारपणे १५ फेब्रवारीपासून टोलनाक्याची वसुली ही फास्टॅगद्वारेच होणार आहे. या करवसुली प्रणालीतून आता रोख रकमेचा कमीत कमी वापर होणार आहे. त्यासाठी तशा सूचना देण्यात आल्या आहेत. परदेशात याच पद्धतीने टोलनाक्याचे शुल्क वसूल केले जाते. दरम्यान, जोपर्यंत सर्व्हर ग्रीन सिग्नल दाखविणार नाही, तोपर्यंत टोलनाक्यावरील बॅरियर वाहनचालकासाठी रस्ता खुला करणार नसल्याचे सांगण्यात आले.
चौकट
प्रत्येक गाडीला स्टीकर आणि अँटिना राहणार
ही फास्टॅग प्रणाली थेट सर्व्हरशी जोडलेली राहणार आहे. ज्या वाहनधारकाचे कुठल्या बँकेत खाते आहे, त्या बँकांच्या खात्यातून टोलचे शुल्क वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर खात्यात रक्कम नसेल, तर सर्व्हर लगेच त्या वाहनचालकाला ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार आहे. त्यामुळे त्यांना रोखीने शुल्क भरावे लागणार आहेत.