लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात जवळपास ८० महिला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आल्या होत्या. परंतु, जिल्हा प्रशासनाने त्यांची दोन दिवसांपासून शस्त्रक्रियाच केली नव्हती. याबाबत लोकमतने गुरुवारच्या अंकात वृत्त प्रकशित केले होते. या वृत्ताची प्रशासनाने तात्काळ दखल घेत गुरुवारी ७८ महिलांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रारंभी गाव पातळीवर आरोग्य शिबीर घेऊन महिलांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी राजी करण्यात आले होते. त्यांना मंगळवारीच जिल्हा शासकीय रुग्णालयात बोलवण्यात आले. त्यांची मंगळवारीच शस्त्रक्रियेपूर्वी कराव्या लागण्याऱ्या आश्वयक त्या वैद्यकीय चाचण्या पुर्ण करण्यात आल्या. तसेच त्यांना जिल्हा रुग्णालयातील एका हॉलमध्ये विश्राम करण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली. दोन दिवसांपासून या महिला येथे थांबल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. याबाबत लोकमतने गुरुवारी ‘डॉक्टरांअभावी शस्त्रक्रिया लांबल्या’ या मथाळ््याखाली वृत्त प्रकाशित केले होते. यावृत्ताची जिल्हा प्रशासनाने गुरुवारी दखल घेत ७८ महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
...अखेर शस्त्रक्रियेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:35 AM