लाकडे नेणाऱ्या दोन ट्रकवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 01:10 AM2019-12-10T01:10:19+5:302019-12-10T01:10:38+5:30
अवैधरीत्या बाभळीच्या लाकडांची वाहतूक करणा-या दोन ट्रकवर वनविभागाच्या पथकाने कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अवैधरीत्या बाभळीच्या लाकडांची वाहतूक करणा-या दोन ट्रकवर वनविभागाच्या पथकाने कारवाई केली. ही कारवाई रविवारी रात्री जालना- मंठा रोडवर करण्यात आली असू, संबंधित ट्रक चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना वन परिक्षेत्र विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत इटलोड, वनपाल एस. एन. बुरकुले, वनरक्षक मनोज कुमावत हे रविवारी सायंकाळी जालना- मंठा रोडवर गस्तीवर होते. त्यावेळी परभणी येथून औरंगाबादच्या दिशेने जाणाºया दोन ट्रकमध्ये बाभळीची लाकडे दिसून आली. या लाकडांबाबत कागदपत्रांची मागणी चालकांकडे केली असता आढळून आली नाहीत. त्यानंतर त्या पथकाने दोन्ही वाहने ताब्यात घेऊन वनविभागाच्या कार्यालयात नेऊन लावली. या प्रकरणात वन विभाग कार्यालयात भारतीय वन अधिनियमन १९२७च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत इटलोड यांनी सांगितले.