पाण्याच्या शोधात कोल्हा पडला विहिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:59 AM2018-11-25T00:59:28+5:302018-11-25T01:00:05+5:30

लेहा परिसरात शनिवारी पाण्याच्या शोधात असलेला एक कोल्हा विहिरीत पडल्याने मोठा गोंधळ उडाला. या कोल्ह्याला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचा जीव वाचवला.

Fox survived by villagers from well | पाण्याच्या शोधात कोल्हा पडला विहिरीत

पाण्याच्या शोधात कोल्हा पडला विहिरीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लेहा : भोकरदन तालुक्यातील लेहा परिसरात शनिवारी पाण्याच्या शोधात असलेला एक कोल्हा विहिरीत पडल्याने मोठा गोंधळ उडाला. या कोल्ह्याला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचा जीव वाचवला.
चालूवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जंगलात पिण्यासाठी पुरसे पाणीसाठे नाहीत. त्यामुळे कोल्हा, हरिण तसेच अन्य वन्यप्राणी हे पाणी तसेच अन्नाच्या शोधात गाव परिसरात येत आहेत. असाच एक कोल्हा लेहा गावाजवळील एका विहिरीत पडल्याचे लक्षात आले. गावक-यांनी याची माहिती वनविभागाला दिली. त्यांनी देखील तेथे येण्याचे मान्य केले. परंतु तोपर्यंत गावातील लोकांनी त्या कोल्ह्याला वाचविण्यासाठी थेट विहिरीत दोर बांधून उतरले. परंतु कोल्ह्याने विहिरीत उतरलेल्या जी.एम. शिनगारे यांना चावा घेतला. त्यांनी कसबसे करून त्या कोल्ह्याच्या अंगावर पाते टाकून त्याला बांधून वर काढले. शिनगारे यांच्यावर नंतर उपचार करण्यात आले. परंतु सर्वांनी कोल्ह्याला वाचविले.
कोल्हा वहिरीत पडल्याची माहिती लेहा परिसरात वा-या सारखी पसरली. विहिरीजवळ पाहणा-यांची गर्दी झाली. मात्र गावक-यांनी एका कोल्ह्यासाठी जे प्रयत्न केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचवले. या गावक-यांच्या प्रयत्नांचे वनविभागाने स्वागत केले. यापुढे जागृत राहण्याचे आवाहनही केले.

Web Title: Fox survived by villagers from well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.