थेट लढतीत राजेश टोपे यांना फटका; शिंदेसेनेचे हिकमत उढाण यांनी घेतली आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 12:32 PM2024-11-23T12:32:43+5:302024-11-23T12:36:12+5:30
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला आहे
घनसावंगी : शरद पवार राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांना घनसावंगीत धक्का बसला असून शिंदेसेनेचे हिकमत उढाण हे आघाडीवर आहेत. टोपे आणि उढाण यांना भाजपचे बंडखोर अपक्ष सतीश घाटगे यांनी आव्हान दिले होते. मात्र, यंदा मतविभागणी न झाल्याने टोपे यांना मोठा फटका बसल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री आ. राजेश टोपे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा विजय मिळविला असून, यंदा ते षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. तर शिवसेना शिंदे गटाने जागा वाटपात अखेरपर्यंत जोर लावत ही जागा आपल्याकडे खेचली आणत, टोपे यांचे राजकीय विरोधक हिकमत उढाण यांना पुन्हा उमेदवारी दिली. या मतदारसंघात टोपे विरूद्ध उढाण अशी थेट लढत राहिली. परंतु, भाजपला सोडचिठ्ठी दिलेले सतीश घाटगे आणि उद्धव सेनेचे माजी आमदार शिवाजी चोथे हे बंडखोर देखील रिंगणात उतरले आहेत. मात्र, त्यांना अपेक्षित मते मिळाली नसल्याचे दिसून आले.
मतदारसंघात पाचव्या फेरीपर्यंत
हिकमत उढाण : 20 हजार 508
राजेश टोपे. : 17 हजार 570
सतीश घाटगे : 4 हजार 686
शिवाजी चोथे: 415
कावेरी खटके: 5 हजार 355
उढाण 2 हजार938 मतांनी आघाडीवर आहेत.