विश्रामगृहाची जागा वसतिगृहासाठी द्या- लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:40 AM2018-08-03T00:40:33+5:302018-08-03T00:42:18+5:30

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृहासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची गुरूवारी बैठक घेऊन शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करुन ही इमारत विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Give place to the hostel - Lonikar | विश्रामगृहाची जागा वसतिगृहासाठी द्या- लोणीकर

विश्रामगृहाची जागा वसतिगृहासाठी द्या- लोणीकर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृहासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांची गुरूवारी बैठक घेऊन शिवाजी पुतळा परिसरात असलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करुन ही इमारत विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, तहसीलदार बिपीन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जालना शहराच्या मध्यभागी जुने शासकीय विश्रामगृह दोन एकर परिसरात असून, या ठिकाणी स्वतंत्र इमारत उपलब्ध आहे.
या ठिकाणी आठ कक्ष आहेत. त्याचबरोबर कर्मचा-यासांठीचे ३२ निवासस्थानेही आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांची चांगल्या प्रमाणात सोय होऊ शकते, या ईमारतीची डागडुजी करुन ही इमारत तातडीने वसतिगृहासाठी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश उपस्थित अधिका-यांना दिले.
रुरबन मिशनच्या कामाचा आढावा
गावांचा सर्वांगिण विकास करण्यात येत आहे, या योजनेंतर्गत शेतक-यांसाठी एमआयडीसीही तयार करण्यात येणार आहे. शेतक-यांनी पीकविलेल्या मालावर प्रक्रिया करणारे १०० उद्योग या एमआयडीसीमध्ये सुरु करण्यात येणार आहेत. या विविध कामांचा शुभारंभ राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Give place to the hostel - Lonikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.