शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश : जात वैधता प्रमाणत्राची अट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 01:00 AM2018-07-11T01:00:59+5:302018-07-11T01:01:36+5:30

शासकीय तंत्रनिकेतनच्या प्र्रवेशाच्यावेळीच जात वैधता प्रमाणपपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आल्याने प्रवेशावर त्याचा विपरित परिणाम झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने यात महत्त्वाचा निर्णय घेतला. दरम्यान यामुळे आता लांबलेल्या प्रवेशांना गती मिळणार आहे.

Government Polytechnic Access: The cancellation of the validity certificate for caste certificate | शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश : जात वैधता प्रमाणत्राची अट रद्द

शासकीय तंत्रनिकेतन प्रवेश : जात वैधता प्रमाणत्राची अट रद्द

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शासकीय तंत्रनिकेतनच्या प्र्रवेशाच्यावेळीच जात वैधता प्रमाणपपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आल्याने प्रवेशावर त्याचा विपरित परिणाम झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने यात महत्त्वाचा निर्णय घेतला. दरम्यान यामुळे आता लांबलेल्या प्रवेशांना गती मिळणार आहे.
जालना जिल्ह्याचा विचार केल्यास अंबड आणि जालना येथे दोन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालये आहेत. यात जालन्यात चार अभ्यासक्रमासाठी ४५० विद्यार्थी संख्या आहे. आता प्रवेश घेण्यासाठी केवळ सहा दिवसांचा कालावधी शिल्लक असताना, पहिल्या प्रवेशासाठी २३० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, व्दितीय वर्षात थेट प्रवेश देण्यासाठी १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी जात वैधता प्रमाणपत्राची अट नसल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवेशासाठी गर्दी झाली होती.
आज जरी जातवैधता प्रमाणपत्राची अट शिथिल केली असली तरी, नंतर जे राखीव प्रवर्गातून आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना त्यांना मिळणाऱ्या शासनाच्या सुविधांचा लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. व्दितीय वर्षात जे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी गुरूवारचा दिवस प्रवेश नोंदणीसाठी अंतिम आहे. तर प्रथमवर्ष प्रवेश नोंदणीसाठी १६ जुलै ही अंतिम तारीख असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस.आर.नवले आणि प्रवेश समिती प्रमुख विलास पाठक यांनी दिली आहे.

Web Title: Government Polytechnic Access: The cancellation of the validity certificate for caste certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.