शासनाचा रिक्त जागा भरण्यासाठी फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:49 AM2018-08-02T00:49:14+5:302018-08-02T00:50:13+5:30

एकीकडे तंत्र शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असतानाच तंत्रनिकेत या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग अचंबित झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता ज्या दहावी, आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नसले तरी, त्यांना २३ आणि २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.

Govt. tact to fill empty places | शासनाचा रिक्त जागा भरण्यासाठी फंडा

शासनाचा रिक्त जागा भरण्यासाठी फंडा

googlenewsNext

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : एकीकडे तंत्र शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत असतानाच तंत्रनिकेत या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे यंदा विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभाग अचंबित झाला आहे. यावर तोडगा म्हणून आता ज्या दहावी, आयटीआय अथवा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नसले तरी, त्यांना २३ आणि २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.
मराठवाडा विभागाचा विचार केल्यास शासकीय तंत्रनिकेतनची संख्या ही ११ आहे. यासाठी केवळ आठ हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून प्रवेशासाठीच्या आॅप्शन आणि कॅप राऊंडमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र मॅकेनिकल, सिव्हील आणि इलेक्ट्रीकल वगळता आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विभागाच्या डिप्लोमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. मराठवाडा विभागात खाजगी तंत्रनिकेतनची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. यंदा शासकीय महाविद्यालयानांच आवश्यक तेवढे विद्यार्थी उपलब्ध होण्याची चिन्ह नसल्याने खाजगी तंत्रनिकेतनचा तर विचार न केलेलाच बरा; असे सूत्रांनी सांगितले.
या विद्यार्थी संख्येच्या प्रश्नावर उतारा म्हणून आता ज्यांनी तंत्रनिकेतनच्या प्रवेशाच्या मुदतीत रजिस्ट्रेशन केले नाही, परंतु त्यांना शासकीय अथवा खासगी तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे, अशा आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी २३ आॅगस्ट तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २८ आॅगस्ट पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
एकीकडे जालन्यातील तंत्रनिकेतन महाविद्यालयाला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा देण्यात येणार होता. तसेच सध्याचे तंत्रनिकेतन हे दुसऱ्या शिप्टमध्ये चालविण्याचा विचारही अंमलात येणार होता. मात्र, आता तंत्रनिकेतनलाच विद्यार्थी मिळत नसल्याने अभियांत्रिकी दूरच राहिले ते बरेच झाले, असे म्हणावे लागेल.
५० टक्केच शुल्क लागणार
पंजाबराव देशमुख प्रतिपूर्ती योजने अंतर्गत ईबीसी सवलत असणाºया विद्यार्थ्यांना आता प्रवेशाच्या वेळी केवळ ५० टक्केच शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकाडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी किमान ५० टक्केच रक्कम असणे आवश्यक करण्यात आले आहे.

Web Title: Govt. tact to fill empty places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.