ठिय्या आंदोलनाला आजी, माजी मंत्री, आमदारांचा पाठींबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:57 AM2021-02-06T04:57:11+5:302021-02-06T04:57:11+5:30
जालना : मराठा सामाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी साष्टेपिंपळगावांत सुरु असलेल्या अंदोलनाच्या समर्थनात जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ...
जालना : मराठा सामाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी साष्टेपिंपळगावांत सुरु असलेल्या अंदोलनाच्या समर्थनात जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठींबा दर्शविण्यासाठी ठिय्या अंदोलन करण्यात आले. आंदोलनाला पालकमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, बबनराव लोणीकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी पाठींबा दर्शविला.
शुक्रवारी जिल्हाअधिकारी कार्यालयासमोर ठिय्या अंदोलन करण्यात आले. या अंदोलनात मराठा समाजातील जेष्ठ, युवक सहभागी झाले होते. या ठिय्या अंदोलनास आ. कैलासजी गोरंट्याल, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, माजी आ. संतोष सांबरे, नगराध्यक्षा संगिताताई गोरंट्याल आदींनी अंदोलन स्थळी भेट दिली.
पालकमंत्री राजेश टोपे यांनी मराठा समाजाला पाठींबा दर्शवित मराठा समाजाचे विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न् सोडविण्यासा आपण कटीबध्द् असल्याचे सांगितले. माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी शासनास मराठा आरक्षणाची भक्कम बाजु न्यायालयात मांडण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासोबत चर्चा असल्याची ग्वाही यावेळी दिली. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आरक्षण प्रश्न विधानसभेत उपस्थित करुन शासनाला धाऱ्यावर धरु व मराठा सामाजाला न्याय मिळवुन देऊ अशी हमी दिली.
अंदोलनप्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्व्यक राजेश राऊत, विष्णु पाचफुले, सतिश देशमुख, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, ज्ञानेश्वर ढोबळे, अशोक पडुळ जयंत भोसले, महेश निकम, संजय देठे, रविंद्र जगदाळे, विजय वाढेकर, भरत मानकर, नरसिंह पवार, शैलेश देशमुख, शुभम टेकाळे, संतोष कऱ्हाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर ढोबळे यांनी केले, तर आभार विष्णु पाचफुले यांनी मानले.