युवा सेनेच्या शहर प्रमुखपदी कदम
परतूर : युवा सेनेच्या परतूर शहर प्रमुखपदी राहुल कदम यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा प्रमुख ए. जे. बोराडे, उपजिल्हाप्रमुख माधव कदम, तालुकाप्रमुख अजय कदम यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. कदम यांच्या नियुक्तीचे तालुक्यात सर्वत्र स्वागत केले जात आहे.
अवैध प्रवासी वाहतूक; प्रशासनाचे दुर्लक्ष
जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरातील विविध चौकात मुख्य मार्गावरच वाहने उभी करून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात भरले जात आहेत. एकीकडे रस्ता अपघाताचे प्रमाण वाढत असताना दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई होत नसल्याचे चित्र शहर आणि परिसरात दिसून येत आहे. प्रशासनाने लक्ष देऊन अवैध प्रवासी वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.
योगशिक्षक दिनेश भुतेकर यांचा सत्कार
जालना : येथील योगशिक्षक दिनेश भुतेकर यांनी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल त्यांचा प्राचार्य डॉ. एस. बी. बजाज, उपप्राचार्य डॉ. पगारे, प्रा. स्वप्नील सारडा, क्रीडा विभागप्रमुख डॉ. हेमंत वर्मा आदींनी त्यांचा सत्कार केला. भुतेकर यांनी ब्रॅव्हो योगासनामध्ये नाव नोंदविले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही भुतेकर यांनी उत्कृष्ट योेगासने सादर करीत इतर स्पर्धकांपेक्षा अधिक चांगले योगा केले. या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.