लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील दिव्यांग मुलांना सक्षम करण्यासाठी शासनाकडून दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. ही कार्यशाळा विशेष शिक्षकांची झाली असून येथील जिल्हा शैक्षणीक सातत्यपूर्ण विकास संस्थेत पार पडली.या कार्यशाळेत शिक्षण घेतलेले विशेष शिक्षक आता तालुकानिहाय खेड्यापाड्यातील विविध शाळांमध्ये जाणार आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य मुलांप्रमाणे जगण्यासाठी उभे राहतील, असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करणार आहेत. अशी माहिती समावेशित शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सतीश सातव यांनी दिली आहे.जालना जिल्ह्यात पहिले ते आठवीपर्यंतची जवळपास ६ हजार दिव्यांग मुले आहेत. या मुलांकडे अनेकांचा पाहण्यांचा दृष्टीकोण वेगळा आहे. त्यामुळे या मुलांना सक्षम करण्यासाठी शासनाकडून विशेष शिक्षक, साधनव्यय व जिल्हा समन्वयक असे एकूण ४७ जणांना कार्यशाळेत ट्रेनींग देण्यात आली आहे. हे आता दिव्यांग मुलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या शाळेमध्ये जावून पालक, मुले यांना प्रशिक्षण देणार आहेत. यातून ही मुले सामान्य मुलांप्रमाणे जगण्यासाठी उभे राहणार आहेत.ही राज्यातील पहिली कार्यशाळा आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा खरा या कार्यशाळेचा उद्देश होता. या कार्यशाळेती शिक्षक आता तालुकानिहाय शाळांना भेटी देवून दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणणार आहेत. अशी माहिती डॉ. सतीश सातव यांनी दिली.
दिव्यांग विद्यार्थी आता येणार मुख्य प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:21 AM