पत्नीचा खून करून घराला लावले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:27 AM2021-01-17T04:27:12+5:302021-01-17T04:27:12+5:30

भोकरदन : पत्नीचा खून करून घराला कुलूप लावून फरार झालेल्या पतीला भोकरदन पोलिसांनी दोन तासात जेरबंद केले. ही घटना ...

He locked his house after killing his wife | पत्नीचा खून करून घराला लावले कुलूप

पत्नीचा खून करून घराला लावले कुलूप

Next

भोकरदन : पत्नीचा खून करून घराला कुलूप लावून फरार झालेल्या पतीला भोकरदन पोलिसांनी दोन तासात जेरबंद केले. ही घटना तालुक्यातील कुंभारी येथे शनिवारी सायंकाळी समोर आली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

आशा रतन साळवे (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. कुंभारी येथील रतन सांडू साळवे (वय ४५) व त्यांच्या पत्नी आशा रतन साळवे हे कामानिमित्त वडगाव कोल्हाटी (ता. औरंगाबाद) येथे राहतात. त्यांच्यासोबत एक १७ वर्षाचा मुलगा व एक मुलगी राहत होती. १५ जानेवारी रोजी कुंभारी ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने हे दोघे पती-पत्नी १४ जानेवारी रोजी गावी आले होते. ते हसनाबाद रोडवरील राहुलनगर झोपडपट्टी परिसरातील घरात थांबले होते. १६ जानेवारी रोजी सकाळी या दाम्पत्याना शेजाऱ्यांनी घरात पाहिले. मात्र, सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराला बाहेरून कुलूप दिसून आले, तर घरातील लोखंडी पलंगावर आशा साळवे या झोपलेल्या दिसून आल्या. ग्रामस्थांना संशय आल्यानंतर त्यांनी ही माहिती भोकरदन पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलशिग बहुरे, पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे, पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस कर्मचारी रामेश्वर शिंनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

शॉक लागल्याचा केला बनाव

आशाबाईंचा मृतदेह ज्या पलंगावर सापडला त्या पलंगाला शेगडी लावण्यात आली होती. त्या शेगडीचे वायर पलंगाला लावून आशाबाई यांना शॉक लागल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या पाहणीत दिसून आले. घराला बाहेर कुलूप लावून जाणारा आरोपी रतन साळवे याला पोलिसांनी दोन तासांतच जेरबंद केले.

Web Title: He locked his house after killing his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.