साठवण तलावातून जाणारा समृद्धी महामार्ग अडवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:34 AM2018-12-26T00:34:06+5:302018-12-26T00:34:27+5:30

शेतक-यांनी गुरुवारी समृध्दी महामार्गाचे काम बंद पडले. तसेच जो पर्यत मावेजा मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.

Highway blocked by the farmers | साठवण तलावातून जाणारा समृद्धी महामार्ग अडवला

साठवण तलावातून जाणारा समृद्धी महामार्ग अडवला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राजेवाडी साठवण तलावातून समृध्दी महामार्ग जात आहे. या तलावात येथील ३० शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. परंतु, या शेतक-यांना योग्य मावेजा मिळाला नाही. त्यानंतर हे शेतकरी न्यायालयात गेले असता, न्यायालयाने गोदावरी विकास महामंडळाला वाढीव मावेजा देण्याचे आदेश दिले होते. परंतु, या शेतक-यांना अद्यापही मावेजा न मिळाल्याने शेतक-यांनी गुरुवारी समृध्दी महामार्गाचे काम बंद पडले. तसेच जो पर्यत मावेजा मिळत नाही तोपर्यंत काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतक-यांनी घेतला आहे.
गोदावरी विकास महामंडळातर्फे २००६ साली केळीगव्हाण परिसरातील राजेवाडी येथे ५० एकर जागेवर तलावाची निर्मिती करण्यात आली. त्यानुसार तलावात गेलेल्या शेतक-यांची ५३ हजार रुपये एकर नुसार जमीन खरेदी करण्यात आली. परंतु, शेतक-यांनी याला विरोध करत गोदावरी विकास महामंडळाकडे वाढीव मावेजा मागितला. परंतु, महामंडळाने हा मावेजा देण्यास नकार दिला. त्यानंतर सर्वच शेतक-यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायलयानेही गोदावरी विकास महामंडळाने शेतक-यांना योग्य मावेजा देण्याचे आदेश दिले. मात्र, अद्यापही या शेतक-यांना हा मावेजा मिळाला नाही. त्यातच सध्या याच जागेवरुन समृद्धी महामार्ग जात असून, काही दिवसांपूर्वीच शेतक-यांनी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले होते. व जोपर्यंत मावेजा मिळत नाही तो परंतु आम्ही महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा शेतकºयांनी घेतला आहे. यावेळी विठ्ठल मदन, भगवान मदन, शिवाजी मदन, विष्णू मदन, बप्पासाहेब मदन, रामभाऊ मदन, देवुबा सोनवणे, गोरखनाथ मदन, शिवाजी सोनवणे, जगनाथ सोनवणे, हरिचंद्र मदन, शेषराव मदन, मीनाबाई मदन, राम मदन, सुभाष मदन, ज्ञानदेव मदन यांची उपस्थिती होती. जो पर्यंत १८/२८ प्रमाणे निकाली दाव्याचा मावेजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही समृद्धी महामार्गाचे काम होऊ देणार नसल्याचे शेतकरी विठ्ठल मदन यांनी सांगितले.

Web Title: Highway blocked by the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.