संत सेना महाराज यांची जयंती साजरी
जालना : संत शिरोमणी सेना महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास हरिहर शिंदे, बाला परदेशी, दीपक रणनवरे, दिनकर चोरमारे, शिवराम गायके, राजू वैद्य, सचिन भुसारे, भगवानराव वाघमारे, सोपानराव गाढवे, विशाल वाघमारे आदींची उपस्थिती होती.
बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप
घनसावंगी : तालुक्यातील राजेगाव येथे महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेंतर्गत लाभार्थी कामगारांना भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष भरत उगले यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सपाटे, विष्णू तांगडे, शरद सपाटे, विठ्ठल उगले, सोमनाथ उगले यांच्यासह ग्रामस्थ, लाभार्थी कामगारांची उपस्थिती होती.
अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाईची मागणी
जालना : शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. कोठेही सहज दारू उपलब्ध होत असल्याने युवा पिढी व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढले आहे. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, कायदा- सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींना तळीरामांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.