स्वच्छता कामगार महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:30 AM2021-03-10T04:30:43+5:302021-03-10T04:30:43+5:30
महिलांना मास्क, सॅनिटायझर वाटप जालना : बदनापूर तालुक्यातील आन्वी येथील संबोधी महिला मंडळाच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांना मास्क, सॅनिटायझरचे ...
महिलांना मास्क, सॅनिटायझर वाटप
जालना : बदनापूर तालुक्यातील आन्वी येथील संबोधी महिला मंडळाच्या वतीने महिला दिनानिमित्त महिलांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. मंडळाच्या सचिव रंजना भालेराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच ललीता राठोड, कविता सुकोसे, रकुबाई म्हस्के, अध्यक्षा शीलाबाई म्हस्के, सचिव रंजना भालेराव, सुभद्राबाई भालेराव, कमल रत्नपारखे आदींची उपस्थिती होती.
सिंचन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन
जालना : निम्न दुधना प्रकल्प जलाशयावरून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वैध, अवैध विद्युत जोडणी असणाऱ्या सर्व उपसा सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे असलेली पाणीपट्टी निम्न दुधना पाटबंधारे उपविभाग क्रमांक दोन सेलू या उपविभागात ३१ मार्च पूर्वी भरावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. पाणीपट्टी न भरल्यास संबंधितांचे साहित्य जप्त करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
घनसावंगी रूग्णालय परिसराची पाहणी
घनसावंगी : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या प्रयत्नातून घनसावंगी ग्रामीण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन होऊन १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय करण्यात आले आहे. येथे सुरू असलेल्या कामांची, रूग्णसेवेची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी पाहणी केली. यावेळी कल्याण सपाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, तहसीलदार नरेंद्र देशमुख, सभापती भागवत रक्ताटे, बंशीधर शेळके यांची उपस्थिती होती.