चाकूचा धाक दाखवून पती-पत्नीस लूटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:57 AM2021-02-06T04:57:04+5:302021-02-06T04:57:04+5:30
दोघांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा जालना : स्वत:च्या धाब्यावर गर्दी जमवून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुध्द ...
दोघांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा
जालना : स्वत:च्या धाब्यावर गर्दी जमवून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक सुसिश मेहरा (३५, जुना जालना), संतोष शेषराव सुरासे (४४, रा. यशोदीपनगर जालना) असे संशयीत आरोपींची नावे आहेत. पुढील तपास सहाय्यक फौजदार कांबळे हे करीत आहेत.
जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
जालना : घनसावंगी तालुक्यातील चिंचोली येथील जुगार अड्ड्यावर छापा मारून सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई घनसावंगी पोलिसांनी शुक्रवारी केली. मदन तात्या पराडे, अर्जुन बबन लहामगे, मारोती लक्ष्मण खांडे, भिकाजी रधवे, रामनाथ गंगाधर कदम, कैलास बाळू साळवे, राजू दत्तात्रय धोगरे (रा. चिंचोली ता. घनसावंगी) असे संशयीत आरोपींची नावे आहेत. पुढील तपास पोना. राठोड हे करीत आहेत.
अवैध दारूची विक्री करणाºयांवर गुन्हा
जालना : बेकायदेशीररीत्या देशी दारूची विक्री करणाºयास भोकरदन पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. नायबराव भीमराव साळवे (४५, रा. बंरजळा साबळे ता. भोकरदन) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ११२० रुपए किमतीच्या १६ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पुढील तपास नापोकॉ. जैवाळ यांनी केली.
अवैध दारूची विक्री करणाºयास अटक
जालना : बेकायदेशीररीत्या देशी दारूची विक्री करणाºयास भोकरदन पोलिसांनी बरंजळा लोखंडे येथून ताब्यात घेतले. गजानन शालीकराव जाधव (२९, रा. ताडकळस ता. भोकरदन) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ६०० रुपए किमतीच्या १० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पुढील तपास नापोकॉ जैवाळ हे करीत आहेत.
शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारिणी जाहीर
जालना : शिवछत्रपती सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उत्सव समिती कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र राऊत यांची, कार्याध्यक्षपदी सुभाष देवीदान तर सचिवपदी अॅड. रवींद्र डुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक अंकुश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव समिती कार्यकारिणी निवडीसाठी गुरुवारी राजमाता गड येथे बैठक घेण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून जेष्ठ नेते विजयकुमार पंडित, गणेश सुपारकर, अशोक पांगारकर, जयंत भोसले, हरेश देवावाले, सुधाकर निकाळजे, तय्यब देशमुख, विमल आगलावे, संध्या देठे, विभावरी ताकट, रेणूका निकम आदींची निवड करण्यात आली.
बायपास रोड वाहतूक कोंडी
जालना : शहरातील अंबड चौफुली ते मंठा चौफुली या रस्त्यावरील कुंडलिका नदीच्या पुलावर मालवाहू ट्रकचे शुक्रवारी रॉड तुटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. जालना शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने नादुरुस्त झालेली गाडी हटविली. वाहनांच्या २ कि.मी. पर्यंत लांबच लांब रांगा दिसून आल्या. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी कर्मचाºयांसह वाहतूक सुरळीत केली.
चला उद्योजक होऊ या मार्गदर्शन वेबिनारचे आयोजन
जालना : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र्र, जालना आणि थिंक शार्प फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चला उद्योजक होऊ या नाविन्यपूर्ण उद्योजकता अभियानातंर्गत प्रत्येक महिन्यात किमान एकदा आॅनलाईन मार्गदर्शन वेबिनार सुरु करण्यात आले आहे. हा कार्यक्रम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र्र, जालना कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर ९ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे.