जिल्हाधिकाऱ्यांकडून वाळू घाटाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:42 AM2021-02-27T04:42:15+5:302021-02-27T04:42:15+5:30

तळणी : पूर्णा नदीपात्रातील वाळू घाटातून अतिरिक्त व नियमबाह्य उत्खनन होणार याची दक्षता घ्यावी. मंडळ अधिकाऱ्यांनी उत्खननाचा तातडीने अहवाल ...

Inspection of sand dunes by District Collector | जिल्हाधिकाऱ्यांकडून वाळू घाटाची पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांकडून वाळू घाटाची पाहणी

Next

तळणी : पूर्णा नदीपात्रातील वाळू घाटातून अतिरिक्त व नियमबाह्य उत्खनन होणार याची दक्षता घ्यावी. मंडळ अधिकाऱ्यांनी उत्खननाचा तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.

पूर्णा नदीपात्रातील कानडी-लिबंखेडा या वाळू घाटाला जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अचानक शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते. या भेटीदरम्यान त्यांनी वाळू उत्खनन व राॅयल्टी बुकची तपासणी केली. तसेच वाळू भरणाऱ्या मंजुरांशी संवाद साधला. जेसीबीने उत्खनन होणार नाही, वाळू घाटातून अतिरिक्त व नियमबाह्य उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्यावी. आजपर्यंतचे उत्खननाचे मोजमाप करून अहवाल सादर करण्याचे आदेश मंडळ अधिकारी पांडुरंग घुगे यांना जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिले. यावेळी उपजिल्हाधिकारी रोहयोचे परळीकर, परतूरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, आदींची उपस्थिती होती.

नुसते गाडीत फिरू नका

पूर्णा नदीपात्रातून अतिरिक्त व नियमबाह्य वाळू उत्खनन होणार नाही याची दक्षता घ्या. नुसते गाडीत फिरू नका. असाही दम जिल्हाधिकाऱ्यांनी तळणीचे मंडळ अधिकारी पांडुरंग घुगे व तलाठी संतोष पवार यांना दिला.

===Photopath===

260221\26jan_25_26022021_15.jpg

===Caption===

कानडी - लिंबखेडा येथील वाळू घाटाची पाहणी करताना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व इतर. 

Web Title: Inspection of sand dunes by District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.