राकाँकडून इच्छुकांच्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:55 AM2019-07-25T00:55:02+5:302019-07-25T00:55:55+5:30

जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ हे आघाडी धर्मात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटले आहेत. या तीन जागांसाठी अनेकांनी आपण इच्छुक असल्या संदर्भात माहिती दिली.

Interviews of aspirants from Rakan | राकाँकडून इच्छुकांच्या मुलाखती

राकाँकडून इच्छुकांच्या मुलाखती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ हे आघाडी धर्मात राष्ट्रवादी काँग्रेसला सुटले आहेत. त्यात बदनापूर, घनसावंगी आणि भोकरदन मतदारसंघाचा समावेश आहे. या तीन जागांसाठी अनेकांनी आपण इच्छुक असल्या संदर्भात माहिती दिली. घनसावंगी मतदारसंघातून एकमेव विद्यमान आ. राजेश टोपे यांचेच नाव पुढे आले असून, बदनापूर या राखीव मतदारसंघातूनही अनेकजण इच्छुक होते. भोकरदन मतदारसंघातून माजी आ. चंद्रकांत दानवे तसेच परतूरचे सभापती कपिल आकात, माजी जि.प. सदस्य श्रीरंग पाटील यांचा समावेश होता.
येथील हॉटेल बगडियामध्ये सकाळी या मुलाखती पार पडल्या. आगामी विधानसभानिवडणूकीच्या पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी घेतली जात आहे. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने लढणार असल्या तरी त्यांनी पक्ष पातळीवर जालना जिल्ह्यातील पाचही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याचे सांगण्यात आले.
या मुलाखतीच्यावेळी अनेकांनी आपणच कसे पात्र असल्याचे सांगून विजयी होण्यामागची पार्श्वभूमी विशद केली. अनेकांनी केलेल्या कामांची माहिती असणाऱ्या फाईल सोबत आणल्या होत्या. पक्ष निरीक्षक फौजिया खान यांनी प्रत्येक उमेदवाराला आपले म्हणणे मांडण्यासाठी वेळ दिला. या मुलाखतीच्या वेळी बदनापूर विधानसभा मतदारसंघातून बबलू चौधरी, भगवान शिंदे, हर्षकुमार गायकवाड, साहेबराव गायकवाड, शरद अडागळे आणि सुरेश खंडाळे, भोकरदन विधानसभा मतदारसंघातून माजी आ. चंद्रकांत दानवे, श्रीरंग जंजाळ, केशव जंजाळ, लक्ष्मण दळवी, अब्दुल सत्तार अब्दुल रज्जाक,
जालना मतदरसंघातून रवींद्र तौर, नंदकिशोर जांगडे, शेख साजिया यांनी उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या.
या मुलाखत समितीमध्ये निरीक्षक फौजिया खान, डॉ. नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख, भास्कर काळे, माजी आ. अरविंद चव्हाण, बाळासाहेब वाकुळणीकर, बळीराम कडपे, सुरेखा लहाने, अ‍ॅड. संजय काळबांडे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Interviews of aspirants from Rakan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.