लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात चीनमधून आलेल्या एका नागरिकासह थायलंडमधून आलेल्या चार रूग्णांची विशेष काळजी घेतली जात आहे. चीनमधून आलेल्या संशयित रूग्णावर जिल्हा रूग्णालयातील स्वतंत्र कक्षात उपचार केले आहेत. थालयंडहून आलेल्यांनाही संसर्ग झाला नाही. मात्र, केवळ खबरदारीचा उपाय म्हणून ४० जणांना घरातच स्वतंत्र राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली. दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील दुसऱ्या कोरोना संशयिताचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.मंगळवारी या संदर्भात जिल्हाधिकारी बिनवडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात कोरोनाच्या विषाणूचा फैलाव झालेला नाही, त्यामुळे भीतीचे कुठलेच कारण नाही. प्रशासनाने आवश्यक ती पूर्ण खबरदारी घेतली आहे. वेवगेगळ्या खाजगी रूग्णालयात ६० पेक्षा अधिक खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. यापूर्वी जिल्ह्यात दोन जिल्हा संशयित रूग्णालयात दाखल झाले होते. त्यातील एका संशयिताचा अहवाल नेगेटिव्ह आला असून, त्याच्यावर आता जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू असून, दुसºया संशयित रूग्णाचा अहवाल अद्याप पुणे येथून आलेला नाही. परंतु त्या रूग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. चीनमधून आलेल्या एका व्यक्तीची तपासणी करण्यात आली असून, त्यांच्या परिवारातील चार सदस्यांनाही काळजी घेण्याचे सांगितले आहे. त्यांना घरातच स्वतंत्र खोलित राहण्याचे निर्देश दिले असून, त्यांच्या हातावर प्राऊड टू बी प्रोटेक्टेड असा शिक्का मारला आहे.जिल्ह्यातील पाच जण हे थायलंडला गेले होते. त्यांचा शोध घेऊन त्यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परंतु त्यात त्यांना कोरोना बाधेची कुठलीच लक्षणे दिसली नाहीत. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या परिवारातील चाळीस जणांना खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना घरातच स्वतंत्र खोलित राहण्याचे सांगितले आहे. या चाळीस जणांच्या हातावरही प्राऊड टू बी प्रोटेक्टेडचा शिक्का मारल्याचे बिनवडे यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती जाधव, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर आदींची उपस्थिती होती.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या कोरोना संशियत रूग्णाचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड यांनी दिली.जिल्ह्यातील शाळा,महाविद्यालय, चित्रपटगृह बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मॉल आणि मोठ्या किारणा दुकानांमध्येही जास्त गर्दी न करता खरेदी आणि विक्रीच्या सूचना दिल्या आहेत. विविध धार्मिक स्थळांमध्येही भाविकांनी कमीतकमी गर्दी करण्याचे आवाहन केले आहे. गेल्या महिन्याभरात कोणकोण परदेशातून आले आहे, याची माहिती देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केल्याचेही बिनवडे म्हणाले.३० औषधीदुकानांची तपासणीकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आजवर जिल्ह्यातील ३० औषधी दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. मास्कसह सॅनेटायझरचे स्टॉक, विक्री, बिलांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वस्तूंचा साठा किंवा अधिक दराने विक्री करू नये, अशा सूचना जालना येथील औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
विदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:21 AM