बलिदान देणाऱ्यांविषयी कृतज्ञता बाळगणे नागरिकांचे कर्तव्य- देवकर्ण मदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:57 AM2019-07-25T00:57:54+5:302019-07-25T00:58:53+5:30
भारताचे सार्वभौम एकात्म व अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ देवकर्ण मदन यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अलीकडच्या काळात देशभक्तीचा ज्वर वाढला आहे राष्ट्र निष्ठा, देशभक्ती अवश्य हवी. पक्ष, विचारधारा कुठलीही असो; भारताचे सार्वभौम एकात्म व अखंडतेसाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्याविषयी प्रत्येकाने कृतज्ञता बाळगली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ देवकर्ण मदन यांनी केले.
आनंद फाऊंडेशनतर्फे मसाप जालना शाखेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि ग्रंथ प्रकाशन व कवि संमेलन सोहळा मंगळवारी महाराजा अग्रसेन फाउंडेशनच्या सभागृहात उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे हे होते. आनंद फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ शिवाजी मदन, डॉ. नारायण बोराडे, डॉ. आदिनाथ पाटील, डॉ. कार्तिक गावंडे, डॉ. संजीवनी तडेगावकर, डॉ. दिलीप अर्जुने डॉ. भारत खंदारे, डॉ.
राजेंद्र उढाण, प्राचार्य रामलाल अग्रवाल, प्रा संदीप पाटील, संजय लहाने, प्रतिमा भांड यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. देवकर्ण मदन यांनी पैसे कमावण्याची वाढलेली तृष्णा, पालकांचा स्वार्थासाठी होत असलेला वापर, विस्कळीत कुटुंब व्यवस्था इ. विषयांवर भाष्य करतांना जागतिकीकरणाच्या लाटेत पैसा हेच साध्य झाले असल्याने खरा आनंद हिरावला असल्याची खंत व्यक्त केली, जिल्ह्यास दर्जेदार साहित्य परंपरा असून, म.सा.प.चे पदाधिकारी साहित्य चळवळ बळकट करतील असा विश्वास मदन यांनी व्यक्त केला.
सत्कारास उत्तर देताना मसाप चे सचिव पंडित तडेगावकर म्हणाले की, म.सा.प. ने समाजातील प्रत्येक घटकांचा आवाज शासन, न्यायालया पर्यंत पोहोचविला आहे, प्रसंगी आंदोलने केली. सर्वांच्या सहकार्याने नवीन सभासद जोडून नव लेखकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येतील. त्यांना उभे करण्यास मसाप प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही तडेगावकर यांनी दिली.
डॉ. ज्योती धर्माधिकारी लिखित विश्वातील सामर्थ्यशाली स्त्रिया या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनी ग्रंथ निर्मिती, संशोधन व ग्रंथाविषयी अनुभव कथन केले. प्रास्ताविकात डॉ. नारायण बोराडे यांनी निखळ सामाजिक कार्यासाठी आनंद फाऊंडेशनची स्थापना झाली असून, राबविलेले व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रा. रंगनाथ खेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कार्तिक गावंडे यांनी आभार मानले. सत्कार सोहळ्यानंतर शम्स जालनवी, आबा पाटील ( बेळगाव) संतोष नारायण कर (परभणी) धनंजय गव्हाले ( सिल्लोड) यांचे बहारदार कविसंमेलन झाले. यावेळी रसिकांची उपस्थिती होती.
यांचा झाला सत्कार...
मसाप जालनाचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, सचिव पंडित तडेगावकर, कोषाध्यक्ष कैलास भाले, सहसचिव ज्योती धर्माधिकारी, सदस्य डॉ.गजानन जाधव, सुनंदा तिडके, गोविंदप्रसाद मुंदडा, एस. एन. कुलकर्णी, विलास भुतेकर, शिवाजी कायंदे, प्रतिभा श्रीपत, दादासाहेब गि-हे, राम गायकवाड, उध्दव थोरवे, सुरेखा मत्सावार, शशिकांत पाटील, जगन्नाथ खंडागळे, विमल आगलावे, ज्ञानदेव पायगव्हाणे, सुलभा कुलकर्णी, सुधाकर जाधव, भगवंत ठाले पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आल्याची माहिती नारायण बोराडे यांनी दिली.