------------------------------------------
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे आता नगरपंचायत अस्तित्वात येणार असून, तशी घोषणा राज्य सरकारने केल्याची माहिती सरपंच शैलेंद्र पवार यांनी शुक्रवारी दिली.
तीर्थपुरी ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा मिळावा म्हणून ग्रामपंचायतची निवडणूक लांबणीवर टाकली होती. यानंतर राज्य सरकारच्या घोषणेकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून होते. यासाठी घनसावंगीचे आ. तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केल्यानेच हे शक्य झाल्याचे पवार यांनी सांगितले. तीर्थपुरी हे गाव घनसावंगी तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ असून, येथील गावकऱ्यांची नगरपंचायतीचा दर्जा देण्याची जुनीच मागणी होती. ती शुक्रवारी पूर्ण झाल्याने गावकऱ्यांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. तीर्थपुरी ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार, सरपंच शैलेंद्र पवार यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांकडे सततचा पाठपुरावा केला होता. त्याला आ. यश मिळाले असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
फटाके फोडून जल्लोष साजरा
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आल्याची माहिती नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बघान यांनी दिल्याची माहिती सरपंच शैलेंद्र पवार यांनी लोकमतशी बोलताना दिली. ही माहिती मिळताच तीर्थपुरीत फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी शैलेंद्र पवार, शिवाजी बोबडे, प्रशांत बोबडे, अशोक खेत्रे, चंद्रकांत बोबडे, रामेश्वर मुंदडा, परमेश्वर कडूकर, भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजी बोबडे, लक्ष्मण उढाण, चंद्रकांत बोबडे, सुभाष चमणे, अण्णासाहेब चिमणे, राम बोबडे, प्रशांत बोबडे, सोमनाथ वरकड, रवींद्र पवार आणि शेख जुबेर उपस्थित होते.
-------------------------------------------