जालना शहराचे पाणी पुन्हा चोरांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:11 AM2019-05-03T01:11:58+5:302019-05-03T01:12:24+5:30

जालना शहराला वीस-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने जालनेकर नागरिक जाम संतापले आहेत. मात्र, ही पाणी टंचाई निर्माण होण्यामागे पैठण ते अंबड मार्गावरील पाणी चोर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे

Jalna city's water thieves thieves again | जालना शहराचे पाणी पुन्हा चोरांच्या घशात

जालना शहराचे पाणी पुन्हा चोरांच्या घशात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहराला वीस-वीस दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याने जालनेकर नागरिक जाम संतापले आहेत. मात्र, ही पाणी टंचाई निर्माण होण्यामागे पैठण ते अंबड मार्गावरील पाणी चोर जबाबदार असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल आणि माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पाणी चोरांवर नियंत्रण मिळवण्यात पोलीसांना आलेल्या अपयशचा मोठा फटका जालन्यातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपाासून सहन करावा लागत आहे. २४ जानेवारीला पालिकेच्या पथकाने अचानक पाहणी करून पाण्यावर दरोडा घालणाऱ्यांविरूध्द पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल केले होते. परंतु निवडणूकीची संधी साधून पाणी चोरांनी त्यांचा गोरखधंदा पुन्हा जोरात सुरू केल्याचे उघड झाले आहे.
जालना शहाराला २० - २० दिवस पाणीपुरवठा होत असल्याने मोठी टंचाई निर्माण झाली आहे. शहरातील पालिकेच्या तसेच वैय्यक्तीक हातपंपच हे कमी पाऊस पडल्याने आटले आहेत. त्यामुळे नागरिकांना सर्वस्वी पालिकेच्या भरवशावरच तहान भागवण्याची वेळ आली आहे. असे असताना, जालना पालिकेकडून काहीच केले जात नाही. अशी ओरड नागरिकांमधून होत होती. यावर खुलासा करताना बुधवारी नगराध्यक्षा संगीता गोरंट्यला यांनी पत्र परिषद घेऊन पाण्याची चोरी ही पैठण ते पाचोड दरम्यान असलेले शेतकरी तसेच अंबड पालिकेकडून होत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. अंबड पालिका देखील त्यांना केवळ तीन एमलएलडी पाणी घेण्याचे करारात नमूद असताना ते सहा एमलडी पाणी उपसा करत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने पाणी घेण्याची नोंद असणारे मीटर बसविण्या बाबत वारंवार सूचना करूनही ते बसवत नसल्याचे संगीता गोरंट्याल म्हणाल्या.
त्यातच ग्रामिण भागातील गावांना पाणी पुरवठ्याचे टँकर भरण्यासाठी देखील जालन्याच्या पाण्यातूनच ते भरले जात होते. १५ टँकरच्या केवळ ४५ फेºया करणे अपेक्षित असताना येथून थेट ९० टँकर भरले जात असल्याची माहिती प्रत्यक्ष अंबड येथे माजी आ. कैलास गोरंट्याल आणि नगरसेवकांनी अचानक भेट दिली असता दिसून आल्याचे गोरंट्याल म्हणाले.
या संदर्भात गोरंट्याल यांनी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याशी संपर्क साधून या बाबत माहिती दिली. याची तातडीने दखल घेतल्याचे बिनवडे म्हणाले. याच पार्श्वभूमीवर बिनवडे यांनी गुरूवारी सकाळी जालना पालिकेच्या मुख्याधिकारी तसेच पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेऊन पाणी चोरांवर कारवाई करण्यासाठी पोलीस सरंक्षण देण्याची तयारी दर्शवली.
वॉल्व्हमधून चोरी सुरूच
जालना शहरासाठीच्या जलवाहिनीची वॉल्व्ह फोडून त्यातून हजारो लिटर पाण्याची चोरी करण्याचा प्रकार पैठण ते अंबड मार्गावरील श्ेतकरी तसेच टॅँकर लॉबीकडून सुरू आहेत. हे रोखण्यासाठी आम्ही यापूर्वीच आठ जणांवर पाचोड पोलीस ठाण्यात २५ जानेवरीलाच गुन्हे दाखल केले आहेत. परंतु नंतर निवडणूक जाहीर झाल्याने पोलिसांना निवडणूकीच्या कामावर जावे लागले. त्याचा परिणाम म्हणून ही चोरी पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे शेततळे तसेच विहिरींमध्ये व्हॉल्व फोडून पाणी घेतले आहे.
आयुक्त देणार भेट : २० एमएलडीची चोरी
चार मे रोजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर हे पैठण ते जालना दरम्यान असलेल्या जलवाहिनीच्या कामाची पाहणी करणार असून, त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्याधिकारी संतोष खांडेकर,उपमुख्याधिकारी केशव कानपुडे, अभियंता लोंढे, बगळे हे देखील राहणार असून, पोलिस अधिकारी हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.
केंद्रेकर भेट देणार असल्याने यंत्रणा सज्ज झाली असून, त्यांच्या दौºयापूर्वी सर्वकाही अलबेल असल्याचे दाखविण्यात येईल.
जालना शहरासाठीच्या पैठण ते जालना दरम्यान असलेल्या जलवाहिनिला भगदाड पाडून त्यातून जवळपास २० एमएलडी पाण्याची चोरी होत आहे. त्यामुळे जालना शहराला केवळ सहा एमलडी पाणी मिळत असल्याने त्याचे समान वितरण करताना अडचण येत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान घाणेवाडीत अतिरिक्त चार नवीन वीजपंप टाकून एक एमएलडी पाणी उचलण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे संगीता गोरंट्याल यांनी सांगितले.

Web Title: Jalna city's water thieves thieves again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.