जालना जिल्ह्यात नुकसानीचे ९७ टक्के पंचनामे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:20 AM2019-11-10T00:20:34+5:302019-11-10T00:22:51+5:30

जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या पंधरा दिवसांमध्ये हाहाकार उडविला होता. यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, द्राक्ष, डाळींब आदी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची संयुक्त पथके स्थापन करून हे पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास ९७ टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे.

In Jalna district, 90 per cent of the losses were completed | जालना जिल्ह्यात नुकसानीचे ९७ टक्के पंचनामे पूर्ण

जालना जिल्ह्यात नुकसानीचे ९७ टक्के पंचनामे पूर्ण

Next
ठळक मुद्देसोयाबीन, कपाशीचे मोठे नुकसान, बाजारात येणारा कापूस अद्यापही शेतात, द्राक्ष, डाळिंबाचे नुकसान

जालना : जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेल्या पंधरा दिवसांमध्ये हाहाकार उडविला होता. यामुळे सोयाबीन, तूर, कापूस, द्राक्ष, डाळींब आदी पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. महसूल, कृषी आणि ग्रामसेवकांची संयुक्त पथके स्थापन करून हे पंचनामे करण्यात आले. जिल्ह्यात जवळपास ९७ टक्के पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
पावसाळ्याच्या प्रारंभी वेळेवर पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला होता. कसेबसे अत्यल्प पावसावर पिकांनी तग धरला होता. ज्यावेळी पिके हातातोंडाशी आली त्याचवेळी परतीच्या पावसाने घात केला. यामध्ये सर्वाधिक फटका हा सोयाबीनला बसल्याचे चित्र आहे. त्या पाठोपाठ कपाशीही काळवंडली असून, काही ठिकाणच्या कपाशीला पुन्हा कोंब फुटले आहेत. वास्तविक पाहता कापूस बाजारपेठेत येण्याचे हे दिवस असताना आज कापसाच्या वेचणीचाच मुद्दा शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
पिकांप्रमाणेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. कडवंची, नंदापूर आणि अन्य भागातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच विमा कंपन्यांनी नुकसान झाल्यानंतर विमा काढण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केल्याने विमा काढावा कसा? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. जालना जिल्ह्यात द्राक्षापाठोपाठ डाळींबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या फळबागेलाही अवकाळी पावसाचा जोरदर फटका बसला असून, यामुळे फळबाग उत्पादकांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे गतीने केले गेले असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: In Jalna district, 90 per cent of the losses were completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.