निवडणुकीसाठी जालना जिल्हा प्रशासन तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 12:35 AM2019-03-12T00:35:38+5:302019-03-12T00:35:46+5:30

जालना लोकसभा मतदार संघात जालन्यातील तीन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तीन असे सहा विधानसभा मतदार संघ येतात.

Jalna district administration is ready for election | निवडणुकीसाठी जालना जिल्हा प्रशासन तयार

निवडणुकीसाठी जालना जिल्हा प्रशासन तयार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना लोकसभा मतदार संघात जालन्यातील तीन आणि औरंगाबाद जिल्ह्यातील तीन असे सहा विधानसभा मतदार संघ येतात. यासाठी जवळपास १४ हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज लागणार आहे. निवडणुक शांततेत पार पडावी यासाठी आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पाच निरीक्षकांची नियुक्त करण्यात येणार आहे. यावेळी सोशल मीडियावरही प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. निवडणुकी दरम्यान कुठे चुकीचे प्रकार घडत असतील त्यासाठी निवडणुक आयोगाने स्वतंत्र अ‍ॅप लॉच केले आहे. त्यावर तक्रार टाकल्यास तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवून, १०० मिनिटात त्या तक्रारीवर कारवाई करण्यात येणार असल्याची निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सोमवारी दिली.
निवडणुकीची सविस्तर माहिती देण्यासाठी त्यांच्या दालनात पत्र परिषदेचे आयोजन केले होते. यंदाच्या निवडणुकांची अनेक वेगळी वैशिष्ट्ये ेअसल्याचे सांगतानाच मतदान केल्यावर संबंधतिला व्हीपॅट मिळणार असून, मतदान यंत्रणात उमेदवाराच्या नावा सोबतच त्यांचे छायाचित्र राहणार आहे. निवडणुकी दरम्यान दिव्यांग मतदारांसाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यासह पोस्टल मतदारांना ई-मतदान करता येणार आहे. बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक विभागाने निर्देशित केलेले १२ प्रकारचे ओळखपत्र तत्त्वत: मान्य करण्यात येणार आहेत.
पत्रकार परिषदेस पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, निवडणूक उपजिल्हाधिकारी संगीता सानप आदींची उपस्थिती होती.यावेळी दुष्काळाबाबत प्रशासन सतर्क असल्याचे बिनवडे म्हणाले.
चौदा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती
जालना लोकसभा मतदार संघात निवडणुक प्रक्रिया यशस्वी पार पडण्यासाठी चौदा हजार ७३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व अधिकारी, कर्मचाºयांची माहिती ही आॅनलाइन भरण्यात आली आहे. त्यांचे एक प्रशिक्षण पूर्ण झाले आहेत.
एकूण मतदार १८ लाख ४३ हजार
जालना लोकसभा मतदार संघात एकूण १८ लाख ४३ हजार १३१ एवढे मतदार आहेत. त्यात पुरूष ९ लाख ७७ हजार ७४३, महिला ८ लाख ६५ हजार ३७६ मतदार आहेत. तर तृतीय पंथी मतदारांची संख्या ६ असून, त्यात जालना लोकसभा मतदार संघात येणा-या जालना, बदनापूर आणि भोकरदन आणि औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड, पैठण, फुलंब्री यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ अनुक्रमे परतूर आणि घनसावंगी हे परभणी लोकसभा मतदारसंघात येतात.
१९९० मतदान केंदे्र
जालना लोकसभा मतदार संघात एकूण एक हजार ९९० मतदान केंद्र असून, सहायकारी मतदान केंद्रांची संख्या ६६ अशी असून, एकूण दोन हजार ५६ मतदान केंद्रे आहेत. जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात एक हजार ६३३ मतदान केंदे्र असून, ४५ सहायकारी मतदात केंद्र आहेत.

Web Title: Jalna district administration is ready for election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.