लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सागरमाला प्रकल्पांतर्गत जालना-औरंगाबाद रस्ता सहापदरी होणार आहे. समृद्धी महामार्गही शहराजवळून जात आहे. त्यामुळे नाशिक औद्योगिक वसाहतीप्रमाणे जालन्याला महत्त्व प्राप्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांकडून गोदामांसाठी जागेची मागणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात जालना हे गुंतवणुकीचे केंद्र बनणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी रविवारी येथे केला.डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यानाच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या योग भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी. आ. कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, उपाध्यक्ष भास्कर दानवे, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी बापू पाडळकर, उदय वाणी, सिद्धीविनाक मुळे, अशोक पांगारकर, उद्योजक घनशाम गोयल, किशोर अग्रवाल, राजेश सोनी, कैलास लोया, सुधाकर निकाळजे आदींची प्रमुख उपस्थिती होती.खा. दानवे म्हणाले, की दोन महिन्यांपूर्वी रामदेव बाबा यांनी येथील योग शिबिराच्या समारोपात जालन्यात योग भवन बांधावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. जालना-चिखली मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. चार मे रोजी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या हस्ते रसायन तंत्रज्ञान महाविद्यालयाने उदघाटन होणार आहे. सिडका प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी नुकतीचे मंजुरी दिल्याचे खा. दानवे यांनी सांगितले. जिल्ह्यात सहा हजार कोटींची रस्ते काँक्रिटीकरणाची कामे प्रगतीपथावर असून, अन्य पायाभूत सुविधांसाठी केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी दिला आहे. या पुढेही विकास कामांसाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. योग भवनात पतंजली योगपीठाच्या माध्यमातून मोफत योग प्रशिक्षण शिबिरे घेतली जातील, असे पाडळकर यांनी सांगितले. योग भवनात शेतक-यांनाही मार्गदर्शनाची सुविधा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी आ. कैलास गोरंट्याल, अरविंद चव्हाण यांची या वेळी समायोचित भाषणे झाली. कार्यक्रमास नगरसेवक विशाल बनकर, विजय पांगारकर, शशिकांत घुगे, चंपालाल भगत, ज्ञानेश्वर ढोबळे, जीवन सले, शांतीबाई राठी, संध्या देठे, स्वाती जाधव, प्रशांत वाढेकर, डॉ. जगन्नाथ खंडागळे, डॉ. श्रीमंत मिसाळ, धन्नू काबलिये, भागवत बावणे, किशन डागा, योगेश लहाने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन देविदास देशमुख यांनी केले.जालना : राज्यातील पहिले योग भवनजालनेकरांच्या आरोग्यासाठी तातडीने पाठपुरावा करत विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेंर्तत पाच कोटी रुपये खर्चाचे राज्यातील पहिले योग भवन बांधण्यात येत आहे. जालना शहरातील सर्व मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरणाची कामेही सुरू आहेत. जालना-वडीगोद्री रस्त्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
जालना बनणार गुंतवणुकीचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:01 AM