जालन्यात जुगार अड्यावर छापा; सात जण ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:10 PM2018-12-27T20:10:54+5:302018-12-27T20:12:11+5:30
विशेष कृती दलाच्या पथका कारवाई
जालना : तालुक्यातील कचरेवाडी येथे विशेष कृती दलाच्या पथकाने बुधवारी रात्री जुगार अड्यावर छापा मारत ७ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह १ लाख ६८ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राम गोविंद ठोकल (५०), दामोदर ज्ञानेश्वर कचरे (४२), संतोष आसाराम कचरे (३८), हरिभाऊ तुलशीराम कचरे (३०), त्रिंबक नारायण कचरे (४२), गणेश अशोक मईद (३२, सर्व रा. कचरेवाडी) व जितेश चुनीलाल भुरेवाल (३७, रा. काली कृती) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीची नावे आहे.
तालुक्यातील कचरेवाडी येथील एका शेतात काही लोक झन्ना - मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती एडीएसचे पोनि. यशवंत जाधव यांना मिळाली. या माहितीवरुन सदर ठिकाणी छापा मारुन सात जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी असा १ लाख ६८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक. एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थागुशाचे राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोनि. यशवंत जाधव, पोहेकॉ. ज्ञानदेव नागरे, नंदु खंदारे, किरण चव्हाण, नदकिशोर कामे यांनी केली.