मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:18 PM2018-07-26T13:18:58+5:302018-07-26T13:22:48+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी आज सकाळी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला.
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नगर पालिका उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी आज सकाळी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी ठोक मोर्चा सर्वत्र काढला जात आहे. आठ दिवसांपासून सुरु झालेले मोर्चाचे सत्र सुरुच आहे. राज्य शासनाचा निषेध म्हणून कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव व वैजापूरचे आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर जालन्याचे नगर पालिका उपनगराध्यक्ष राजेश रामभाऊजी राऊत यांनी आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला. यामुळे जिल्ह्यातील इतर मराठा लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.