शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर यांची जालन्यातून 13 हजाराहून अधिक मतांची आघाडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 11:53 AM2024-11-23T11:53:02+5:302024-11-23T11:53:53+5:30

जालना विधानसभा निवडणुकीत अगदी सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासून महायुतीचे पाचही उमेदवार आघाडीवर होते.

Jalna-vidhan-sabha-assembly-election-result-2024-winning-candidates-live-Shinde Sena-candidate-Arjun-Khotkar-leading-after-tenth-round-of-counting | शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर यांची जालन्यातून 13 हजाराहून अधिक मतांची आघाडी 

शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर यांची जालन्यातून 13 हजाराहून अधिक मतांची आघाडी 

- शिवचरण वावळे
जालना:
अर्जुन खोतकर यांना दहाव्या फेरीत 13 हजार 500 मतांची आघाडी मिळवली आहे. तर काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल पिछाडीवर आहेत. मोठी आघाडी मिळाल्याने खोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या फोटोंचे कटाऊट झळकवत ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली.

जालना विधानसभा निवडणुकीत अगदी सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासून महायुतीचे पाचही उमेदवार आघाडीवर होते. त्यातही जालना विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन खोतकर 13 हजारांहून अधिकची, तर बदनापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांनी 12 हजारांहून अधिक मतांची लिड मिळवली आहे. 

त्यामुळे निकाल लागण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी मात्र जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली आहे.  
जालना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल आणि शिंदे सेनेचे अर्जुन खोतकर यांच्यात सरळ लढत आहे. अर्जुन खोतकर यांना फेरी निहाय लिड मिळत असल्याचे बघून कार्यकर्त्यांनी देखील छत्रपती संभाजीनगर जालना रोडवरील मतमोजणी सुरू असलेल्या आयटीआयच्या गेटसमोर जमण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Jalna-vidhan-sabha-assembly-election-result-2024-winning-candidates-live-Shinde Sena-candidate-Arjun-Khotkar-leading-after-tenth-round-of-counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.