जुई धरण कोरडेठाक; २५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 12:14 AM2018-11-08T00:14:50+5:302018-11-08T00:15:08+5:30

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरण पूर्णपणे आटल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ५४ वर्षांत हे धरण प्रथमच कोरडेठाक पडले आहे.

Jui Dam dry; Water scarcity of 25 villages | जुई धरण कोरडेठाक; २५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

जुई धरण कोरडेठाक; २५ गावांवर पाणीटंचाईचे सावट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरण पूर्णपणे आटल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ५४ वर्षांत हे धरण प्रथमच कोरडेठाक पडले आहे.
हे धरण २३६ हेक्टर बुडित क्षेत्रात बांधण्यात आले आहे. या धरणाची बांधणी १९५८ मध्ये सुरू होऊन १९६४ मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले होते.हे धरण व्हावे म्हणून बाभूळगाव येथील शेतकरी कै. माजी मंत्री भगवंतराव गाढे यांच्या पुढाकाराने झाली होती. हे धरण निर्मितिपासून आज पर्यंत ५४ वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदा पावसाळ्यात धरण कोरडेठाक पडल्याचे चित्र दिसत आहे. १९७२ च्या दुष्काळा विषयी चर्चा केली असता, त्यावेळी खायाला अन्न नव्हते.परंतु पाण्याची कमतरता जाणवली नव्हती. त्यावेळी या धरणात पाणी होते. त्या तुलनेत आजच्या दुष्काळाची तुलना केली तर हा दुष्काळ खूप भयानक आहे. असल्याचे वास्तव आहे. या धरणात पावसाळ्यात पाहिजे तेवढे पाणी न साचल्यानेही हे धरण आटले आहे. धरणावर २५ गावाचा पिण्याच्या पाण्याचा भार आहे. भोकरदन शहर, दानापूर, दगड़वाड़ी, करजगाव, कल्याणी, कठोरा बाजार, सुरंगळी, वाडी, वरुड, रेलगाव, देहेड, मूर्तड, पिंपळगांव, बाभूळगाव, भायडी, तलनी, विरेगाव, मनापूर, मलकापूर, सिपोराबाजार, निंम्बोला, रामेश्वर कारखाना या आदी गावाना या धरनातून पाणी पुरविले जाते सध्या या गावाना भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातील विहिरी देखील आटल्याने भविष्यात पाणी टंचाई आणखी तीव्र होणार असल्याचे चित्र हे धरण आटल्याने दिसून येत असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Jui Dam dry; Water scarcity of 25 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.