मजुरांच्या हाताला काम मिळेना, प्रशासनाकडून जेसीबीने गाळ उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:41 AM2019-05-08T00:41:46+5:302019-05-08T00:43:03+5:30
दहीफळ भोंगाने येथे तलावातील गाळ काढण्याचे काम जेसीबी ने सुरु आहे, वेगवेगळ्या तारखांना एकूण २७३ मजुरांनी कामाची मागणी केली आहे, परंतु केवळ १६ दिवस काम दिले त्यानंतर मजुरांना काम नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यातील दहीफळ भोंगाने येथे तलावातील गाळ काढण्याचे काम जेसीबी ने सुरु आहे, वेगवेगळ्या तारखांना एकूण २७३ मजुरांनी कामाची मागणी केली आहे, परंतु केवळ १६ दिवस काम दिले त्यानंतर मजुरांना काम नाही.
दुष्काळात आचारसंहिता शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगकडे केली होती. दुष्काळात जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार दररोज बैठका घेत आहे, तर दुसरीकडे कामाची मागणी केलेल्या मजुरांना काम मिळत नाही.
दुष्काळात सरकार जनतेला वाऱ्यावर सोडून जलयुक्तच्या नावाखाली अकुशल कामे जेसीबी मशिन असलेल्यांना देऊन मजुरांना उपाशी ठेवण्याचे काम करत आहे.
मजुरांना काम नाकारून जेसीबी ला काम मिळते याचा अर्थ काय आहे, हे लक्षात घेऊन मजुरांना कामे नाकारणा-या प्रशासनाचा निषेध महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा करत आहे.
येणा-या काळात कामासाठी व कामे नाकारल्या मुळे मजुरांना कायद्यानुसार बेरोजगार भत्ता तातडीने देण्याची मागणी केली आहे.