विद्यार्थिनींना दिले स्वसंरक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:44 AM2018-09-14T00:44:55+5:302018-09-14T00:44:57+5:30
इन्नरव्हील क्लबच्या वतीने डग्लस हायस्कूलमधील शंभर विद्यार्थिनींना स्व संरक्षणाचे धडे देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील इन्नरव्हील क्लबच्या वतीने डग्लस हायस्कूलमधील शंभर विद्यार्थिनींना स्व संरक्षणाचे धडे देण्यात आले. यासाठी आठ दिवसांच्या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आजघडीला मुलींना स्वसंरक्षण आत्मसात करणे गरजेचे झाले आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देता यावे यासाठी स्वत:कडे एक स्वतंत्र शक्ती असणे आवयक आहे. अन्याय, अत्याचाराला न घाबरता महिलांनी धाडसाने आपले करिअर केले पाहिजे असे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी केले. पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत या शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी औरंगाबाद येथील गणेश कानोजिया यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अशा प्रकारच्या शिबिरांमुळे शिस्त, जिद्द व आत्मविश्वास वाढीस लागण्यास मदत होते असे कानोजीया यांनी सांगितले.
कार्यक्रमास इन्नरव्हील क्लब आॅफ सेंट्रलच्या अध्यक्षा स्मिता जैन यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डग्लस हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कांबळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष स्वप्नील बडजाते, भरत जैन, महेश सारस्वत, माजी अध्यक्ष रितू बजाज, अनघा देशपांडे, प्रीती लाहोटी, राजेश्वरी अग्रवाल, संगीता मोतीवाला, संगीता अग्रवाल, नीता अग्रवाल, संगीता मोतीवाला यांच्यासह प्रकल्प प्रमुख मनीषा पुरी यांची उपस्थिती होती.