जालना जिल्ह्यातील २५ औषध दुकानांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:56 AM2019-11-18T00:56:48+5:302019-11-18T00:57:12+5:30

एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणा-या २५ दुकानदारांचा परवाना काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आला आहे.

 License of 3 drug stores in Jalna district suspended | जालना जिल्ह्यातील २५ औषध दुकानांचे परवाने निलंबित

जालना जिल्ह्यातील २५ औषध दुकानांचे परवाने निलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नियमांचे उल्लंघन करून औषधांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणा-या २५ दुकानदारांचा परवाना काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आला आहे. तर ४५ जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून, एका व्यावसायिकाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवा ही महत्त्वाची आहे. आजारी व्यक्तीला देण्यात येणारी औषधे विक्रीबाबत औषध प्रशासनाने व्यवसायिकांना नियम घालून दिले आहेत. औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्या अंतर्गत नियमानुसार औषधांची विक्री करावी, याबाबत वेळोवेळी औषध प्रशासनाच्या वतीने सूचना दिल्या जातात. शिवाय औषध प्रशासनातील अधिकारी नियमित शहरी, ग्रामीण भागातील औषध विक्री करणा-या दुकानांची तपासणी करतात. या तपासणीत औषध विक्रीच्या नोंदी न ठेवणे, बिले न ठेवणे, फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री करणे, डॉक्टरांची चिठ्ठी नसताना औषधांची विक्री करणे आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त अंजली मिटकर व त्यांच्या टीमने जिल्ह्यातील औषध विक्री करणा-या दुकानांची एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत तपासणी केली. यात जालना, घनसावंगी, अंबड, मंठा, बदनापूरसह ग्रामीण भागातील विक्रेत्यांनी वरील नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या २५ व्यवसायिकांचे परवाने काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. निलंबन कालावधीत औषधांची विक्री न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. यातील काही दुकानदरांच्या कारवाईचा कालावधी पूर्ण झाल्याने परवाना पूर्ववत करण्यात आले आहेत. याच दरम्यान ४५ व्यवसायिकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. संबंधितांचा खुलासा आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Web Title:  License of 3 drug stores in Jalna district suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.