कर्जवसुलीस स्थगिती असतानाही कर्ज खात्यात रक्कम केली वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:33 AM2018-11-27T00:33:03+5:302018-11-27T00:33:23+5:30
दुष्काळात कर्जवसूलीस स्थगिती असतानाही कापूस विकून आलेले २२ हजार रूपये हे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शोखेने कर्ज खात्यात वर्ग केल्याने माझी अडचण झाल्याची व्यथा जालना तालुक्यातील देऊळगाव -सी येथील शेतकरी राजेंद्र बाबूराव खरात यांनी मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सध्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. असे असताना शासनाने दुष्काही जाहीर केला आहे. या दुष्काळात कर्जवसूलीस स्थगिती असतानाही कापूस विकून आलेले २२ हजार रूपये हे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शोखेने कर्ज खात्यात वर्ग केल्याने माझी अडचण झाल्याची व्यथा जालना तालुक्यातील देऊळगाव -सी येथील शेतकरी राजेंद्र बाबूराव खरात यांनी मांडली.
सोमवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान राजेंद्र खरात हे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते. परंतु ते जनसुनावणीसाठी बाहेर गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी तेथे उपस्थित आमच्या प्रतिनिधीशी खरात यांनी आपली व्यथा मांडली. त्यांनी गेल्या आठवड्यात त्यांचा कापूस हा देऊळगावराजा येथील एका खासगी जिनिंगमध्ये विक्री केला होता. त्यापोटी त्यांना संबंधित जिनिंग मालकाने २२ हजार रूपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेश खरात यांनी त्यांचे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेत असलेल्या बचत खात्यात क्लिअरींगसाठी टाकला होता.
हा धनादेश क्लिअर झाल्यावर त्याची रक्कम काढण्यासाठी बँकेत गेले असता, त्यांचे हे २२ हजार रूपये त्यांच्या कर्जखात्यात जमा केल्याचे व्यवस्थापकांनी त्यांना सांगितले. परंतु साहेब कर्ज वसुलीस सध्या सरकारने स्थगिती दिली आहे. असे सांगूनही बँकेने त्यांचे काहीएक ऐकले नाही. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिका-यांकडे या संदर्भातील निवेदन दिले आहे. विशेष म्हणजे शासनाने पीककर्ज दीड लाख रूपयांपर्यंतचे माफ केले आहे, त्यामुळे माझे कर्ज केवळ ६० हजार रूपयांचेच आहे. त्यामुळे तुम्ही ही रक्कम कर्ज खात्यात वळती करू नये अशी विनंती केली. मात्र ही शेतकºयांची विनंती नाकरण्यात आली. तसेच तुम्ही जे कर्ज घेतले आहे, ते शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी घेतलेली आहे, तुमचे पीककर्जच माफ झाल्याचा युक्तिवाद बँक अधिका-यांनी केल्याचे खरात यांनी सांगितले.