लकी ड्रॉद्वारे योजनेच्या लाभार्थ्यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:29 AM2019-02-14T01:29:23+5:302019-02-14T01:30:41+5:30
बीज भांडवलासाठी २५० तर थेट कर्जासाठी २०२ जणांची लकी ड्रॉ मधून बुधवारी निवड करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपुर्वी लाभार्थ्यांनी बीज भांडवल व थेट कर्जासाठी जिल्हा कार्यालयाला प्रस्ताव पाठविले होते. यापैकी बीज भांडवलासाठी २५० तर थेट कर्जासाठी २०२ जणांची लकी ड्रॉ मधून बुधवारी निवड करण्यात आली.
महात्मा फुले मागासवर्ग
महामंडळ (मर्या) तर्फे नियमित अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. यामुळे काही दिवसांपुर्वी जिल्हा कार्यालयाने आॅनलाईन प्रस्ताव मागितले होते. याला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांनीही चांगला प्रतिसाद देत बीज भांडवलसाठी ५८० जणांनी प्रस्ताव दिले. तर थेट कर्ज यासाठी ४६२ नागरिकांनी प्रस्ताव पाठविले होते. या सर्व अर्जाची बुधवारी अप्पर जिल्हाधिकारी व लाभार्थी निवड समितीतर्फे लाभार्थ्यांनी आॅनलाईन केलेल्या थेट कर्ज प्रकरणामध्ये रेडमाईझेशन पद्धतीने व बीज भांडवल योजनेचे चिठ्ठिद्वारे निवड करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे हा कार्यक्रम झाला. सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यंदा जिल्हा कार्यालयाला बीज भांडवलसाठी १२५ प्रस्तावाचे उद्दिष्ट देण्यात आले असून, प्रस्ताव ५८० आले होते. यामुळे एकास २ या प्रमाणे २५० लाभार्थ्यांची निवड चिठ्ठ्यांद्वारे करण्यात आली. तसेच थेट कर्ज यासाठी ४६१ जणांनी प्रस्ताव पाठविले होते. यातील काही प्रस्ताव अपात्र ठरली असून २०२ प्रस्ताव पात्र ठरली. यात १६६ पुरूष व ३६ महिला आहेत. अशे एकूण २०२ जण आहेत. यात कार्यालयाला २५ प्रस्तावांचे ध्येय देण्यात आले आहे. त्यामुळे यातील २५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
निवड : एकास दोन लाभार्थी
सर्वप्रथम बदनापूर तालुक्यातील लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या तालुक्याला बीज भांडवलासाठी १२ लाभार्थ्यांचे ध्येय देण्यात आले आहे. पण, ४६ जणांचे प्रस्ताव आले होते. यात एकास दोन या प्रमाणे २४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. अंबड तालुक्यासाठी १६ लाभार्थ्यांचे ध्येय आहे. परंतु, ६८ जणांनी प्रस्ताव दिले होते. यापैकी ३२ जणांची निवड करण्यात आली.