लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पुणे येथे २ ते ७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे सोमवारी निवड चाचणी घेऊन जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला.महाराष्ट्र केसरीसाठी फ्री-स्टाईल गादी गटात मोहन सरकटे, संदीप चव्हाण, प्रमोद काळे, ओमप्रकाश काठोठीवाले, वैभव थोरवे, रामेश्वर खरात, सुरेश यज्ञेकर, भूषण काळे, सयाजी बाळराज, अर्जुन भगत, भरत काळे, बाबासाहेब चव्हाण, शेख अस्लम शेख वाहेद, जगदीश चरावंडे, उत्तम वीर, परख भक्त, विशाल कापसे, भगवान बाबर तर फ्री-स्टाईल माती गटात आनंद जाधव, सॅक्युवेल जाधव, सिद्धांत पठारे, शुभम गत्ते, संदीप काटकर, करण गजम, पवन सरकटे, यश लहाने, स्वप्नील मोठे, सुनील जोगदंड, धनंजय कचरे, विठ्ठल बोंद्रे, बालाजी एलगुंदे, अक्षय सहारे, अरुण चरावंडे, राहुल प्रधान, ज्ञानेश्वर जाधव, महाराष्ट्र केसरी गटात विलास डोईफोडे यांची निवड करण्यात आली आहे.याप्रसंगी प्रा. दयानंद भक्त दीपक भुरेवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरप्रमुख नंदू जांगडे, नगरसेवक विजय कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मिर्झा अन्वर बेग, जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण सुपारकर, कन्हैया जांगडे, शिवसेना शहरप्रमुख प्रा. डॉ. आत्मानंद भक्त, मार्केट कमिटी संचालक गोपाल काबलिये, प्रा. डॉ. भिकूलाल सले, आखाडा कुस्ती प्रशिक्षक जय भगवान, जिल्ह्याचे प्रसिध्द पहिलवान शेषराव आगलावे आदींची उपस्थिती होती. या संघास अनेकांनी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.पुणे येथे होऊ घातलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जालना जिल्ह्यातील अनेक मल्लांनी सहभाग नोंदविण्यासाठी निवड चाचणीत भाग घेतला.चाचणीमधून जे उत्कृष्ट मल्ल आहेत, त्यांची आम्ही निवड केली आहे. त्यामुळे पुणे येथील कुस्ती स्पर्धेत हे पहेलवान जालन्याचे नाव उंचावतील.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2020 1:27 AM