महात्मा जोतिबा फुलेंनी जात, धर्म बदलण्याचे काम केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:19 AM2019-02-25T00:19:47+5:302019-02-25T00:20:38+5:30
महात्मा जोतिबा फुले यांनी जातिव्यवस्था उखडून टाकली. या देशात शेतीचे अर्थशास्त्र त्यांनी मांडले. तसेच जात, धर्म, विवाहसंस्था बदलण्याचं काम करून त्यांनी देशात मोठा बदल घडवून आणला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समीक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : महात्मा जोतिबा फुले यांनी जातिव्यवस्था उखडून टाकली. या देशात शेतीचे अर्थशास्त्र त्यांनी मांडले. तसेच जात, धर्म, विवाहसंस्था बदलण्याचं काम करून त्यांनी देशात मोठा बदल घडवून आणला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ समीक्षक, विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.
महात्मा फुले प्रतिष्ठान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले विचार, समाजसुधारणा व प्रासंगिकता याविषयावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना डॉ. प्रल्हाद लुलेकर म्हणाले की, कुटुंबासह सामाजिक प्रश्न मांडत असतांना तुमचं शोषण कसं चालू आहे हे जोतिबांनी दाखवून दिलं. स्त्री-पुरुष दोघांना समान मानणाऱ्या फुलेंनी वयाच्या विसाव्या वर्षी दलित, अस्पृश्य स्त्रियांसाठी शाळा काढली. वाचनालय सुरु केली. तसेच बालहत्या प्रतिबंधक गृहही सुरु केले.
सावित्रीबाई फुले यांनी समाज बदलण्याचे काम केले. त्यांनी दुष्काळात हजारों भाकरी थापून गोरगरीबांना जेऊ घातले. दुष्काळाच्या काळात सावित्रीबाईंनी पुण्याच्या कमिशनरची भेट घेऊन जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाºयाचा प्रश्न सोडविला, असल्याचेही त्यांनी सांगितले.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजक डॉ. स्मिता अवचार, संयोजन समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी यांनी परीश्रम घेतले. याप्रसंगी डॉ. बंडू कावळे, डॉ. पुरुषोत्तम मनगटे, डॉ. नवनाथ शिंदे, डॉ. गांधी बानायत यासह परिषदेत महाराष्ट्रातील विविध अभ्यासक, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. सूत्रसंचालन डॉ. आसाराम बेवले यांनी तर डॉ. गोवर्धन मुळक यांनी आभार मानले.