यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मागण्यांचे निवेदन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांना हे निवेदन दिले. यावेळी आयएमए संघटनेचे अध्यक्ष डॉ. अतुल जिंतूरकर, सचिव डॉ. सागर गंगवाल, डॉ. मिसाळ, डॉ. सुरेश साबू, डॉ. प्रकाश सिगेदार, डॉ. अनुराधा राख, डॉ. श्रेयस गादीया, डॉ. राजीव डोईफोडे, डॉ. अमोल वाघ, डॉ. राजीव जेथलिया आदींची उपस्थिती होती.
चौकट
कोरोनाचे आव्हान संपलेले नाही.
कोरोनाने अनेक डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे. देशभरात जवळपास ४००पेक्षा अधिक डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. असे असतानाही कुठल्याच डॉक्टरांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला नाही. एवढे करूनही देशासह राज्यात काही ठिकाणी डॉक्टरांना मारहाण करणे आणि रुग्णालयांची मोडतोड करण्याचे प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या सर्व अनलॉक केले आहे. त्यामुळे कोरोना संपला, असे समजू नये. मास्क आणि सुरक्षित अंतर पाळण्याचे आवाहन आयएमए या संघटनेने केले आहे.