मंठा- वाटूर रस्त्याचे काम करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:27 AM2021-01-18T04:27:49+5:302021-01-18T04:27:49+5:30

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली जालना : गत काही दिवसांपासून सतत वातावरणात बदल होत आहेत. बदलत्या वातावरणामुळे या भगातील ...

Mantha-Watur road work instructions | मंठा- वाटूर रस्त्याचे काम करण्याच्या सूचना

मंठा- वाटूर रस्त्याचे काम करण्याच्या सूचना

Next

ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

जालना : गत काही दिवसांपासून सतत वातावरणात बदल होत आहेत. बदलत्या वातावरणामुळे या भगातील रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभऱ्यासह इतर पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. रोगराईचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत आहेत. यंदा उत्पादनात घट होण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

बाजारपेठेतील शाळू ज्वारीचे दर वधारले

जालना : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भुसार मार्केटमध्ये शाळू ज्वारीचे दर वधारले आहेत. बाजारत विक्रीस आलेल्या ५६७ क्विंटल ज्वारीला कमाल ३१००, तर किमान १३००, तर सरासरी १९०० रुपये दर मिळाला. सध्या बाजारात तुरीची आवकही सुरू झाली आहे. पाच हजार ८४० क्विंटल पांढरी तूर, ५६१ क्विंटल लाल तूर विक्रीस आली आहे. पांढऱ्या तुरीला क्विंटलला कमाल ५९३३, तर किमान ४४०० रुपये दर मिळत आहे.

Web Title: Mantha-Watur road work instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.