अनेक कंपन्यांनी उत्पादनात केली कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:03 AM2019-09-16T00:03:29+5:302019-09-16T00:04:31+5:30

मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे.

Many companies cut production | अनेक कंपन्यांनी उत्पादनात केली कपात

अनेक कंपन्यांनी उत्पादनात केली कपात

Next

संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे. तसेच रात्रीची तिसरी शिप्ट जवळपास बंद केली आहे. याचा परिणाम म्हणून हंगामी कामगारांवर -कॅज्युअल गंडांतर आले आहे. एकूणच २००८ मध्ये मंदी होती, परंतु ती एवढ्या मोठ्या प्रमाणावर नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालन्यातील एनआरबी कंपनीला जालन्यातील उद्योग विश्वात मानाचे स्थान आहे. साधारणपणे १८८१ पासून ही कंपनी अविरत सुरू आहे. वाहनांसाठी लागणारे वेगवेगळ्या आकाराचे बेरींग्ज येथे तयार होतात. जवळपास एक हजार कामगारांना यामुळे रोजगार मिळाला आहे. परंतु सध्या देशातील आॅटोमाबईल क्षेत्रात आलेली मंदी ही मोठी असल्याचे सांगण्यात आले. वाहन उद्योगातील अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी आपले उत्पादन लक्षणीयरित्या घटविल्याने आम्हालाही उत्पादन कमी केल्या शिवाय पर्याय नसल्याचे कंपनीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सांगण्यात आले. या कंपनीचे बेरींग्ज हे देशासह परदेशातील अनेक बड्या वाहनांमध्ये वापरले जातात. साधारपणे एका वाहनात आठ ते दहा बेरींग्जचा उपयोग होतो. परंतु आता ही मागणी कमी झाल्याने हंगामी कामगारांना कमी करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतल्याचे सांगण्यात आले.
स्टील उद्योगातील मंदीचे सावट अद्याप हटलेले नाही. गेल्या चार महिन्यांपासून स्टीलच्या दरात कपातीचा मोठा फटका उद्योजकांना बसलेला आहे.
एकीकडे पावसाने देखील पाठ फिरवल्याने स्टीलची मागणी घटली आहे. आता नवरात्रा नंतर यात काही अंशी बदल होईल अशी अपेक्षा उद्योजक ठेवून आहेत. आॅटोमोबाईलशी संदर्भातील दुसरी एक मोठी कंपनी म्हणजेच एल.जी. बालकृष्ण ही असून, या कंपनीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी लागणा-या चैनचे उत्पादन केले जाते. त्या संदर्भात सीटू औरंगाबाद मजदूर युनियनचे ज्येष्ठ कामगार नेते उध्दव भवलकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, मंदीचा कहर आहे, परंतु तो सध्या जालन्यातील बालकृष्ण कंपनीला अद्यापतरी बसलेला नाही. सध्या त्यांच्याकडे जुन्या आॅर्डर असल्याने उत्पादन जैसे थे असल्याचे भवलकर म्हणाले.
आॅर्डर तयार परंतु पैसे थकले
जालन्यातील लघुउद्योगातील अनेक उद्योजकांना देशासह परदेशातून वस्तू निर्मितीच्या आॅर्डर आहेत. त्यानुसार डिझाईन करून उत्पादन तयारही केले आहे. परंतु हे उत्पादन तयार आहे, तुम्ही पैसे देऊन घेऊन जा असा संपर्क वारंवार आॅर्डर देणाऱ्यांकडे करूनही त्यांच्याकडून आता पूर्वी सारखा प्रतिसाद मिळत नाही.
त्यामुळे आमची लाखो रूपयांची गुंतवणूक रखडली असून, दिलेल्या आॅर्डर आता कधी डीलेव्हर होतात. याकडेच लक्ष लागून असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

Web Title: Many companies cut production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.