तूर नोंदणीची १५ मार्च डेडलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 12:24 AM2020-03-12T00:24:07+5:302020-03-12T00:25:48+5:30

नाफेडकडून जालन्यात सहा हमीभाव केंदे्र सुरू केली आहेत.

March 8 deadline of registration for farmers | तूर नोंदणीची १५ मार्च डेडलाइन

तूर नोंदणीची १५ मार्च डेडलाइन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : यंदा तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ती हमी भावाने खरेदी करून त्यांना आर्थिक मदत करण्याच्या हेतूने नाफेडकडून जालन्यात सहा हमीभाव केंदे्र सुरू केली आहेत. आतापर्यंत जवळपास ९०० पेक्षा अधिक शेतक-यांनी सात हजार ९८३ क्विंटल खरेदी झाली असल्याची माहिती नाफेडच्या पणन अधिकारी विमल वाघमारे यांनी दिली.
गेल्यावर्षी अवकाळी पावसामुळे अनेक पिकांना मोठा फटका बसला, परंतु तुरीला याचा ख-या अर्थाने लाभ झाला असेच कृषी विभाकगडून सांगण्यात आले. काही अंशी काळी पडल्याचे प्रकार पुढे आले आहेत, परंतु ते किरकोळ स्वरूपाचे असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात जवहपास एक लाख हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे यंदा चांगले उत्पादन होईल असे भाकीत होते. ते जवळपास खरे ठरले आहे. त्यातच आता सरकारने हमीभावही चांगला वाढवून दिला आहे. पाच हजार ८०० रूपये प्रतिक्ंिटल तूर खरेदी करण्याचे निर्देश आहेत.
यामुळे जिल्ह्यातील सहा ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आली असून, जालन्यासह मंठा, परतूर, अंबड, तीर्थपुरी भोकरदनचा समावेश आहे. दरम्यान जास्तीत जास्त शेतक-यांनी या चांगल्या हमीभावाचा लाभ घ्यावा यासाठी शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवर मेसेजस पाठविण्यात आले आहे. जवळपास दोन हजारपेक्षा अधिक शेतक-यांना हे मेसेज पाठविले असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.
एकूणच हमीभाव जरी यंदा चांगले असले तरी, अनेक शेतक-यांनी आपल्या तूर या खाजगी व्यापा-यांनाच देणे पसंत केल्याचे दिसून येते. याचे कारण शेतक-यांना विचारले असता, व्यापा-यांकडे आम्हाला लगेचच थोडा कमी दर का असेना, तो रोखीने मिळतो. तसेच अनेकवेळा आम्ही काही कामानिमित्त अडत व्यापा-यांकडून उचलही घेतली जाते. त्यामुळे नाफेडकडे तूर आणून घालण्यास शेतकरी प्राधान्य देत नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: March 8 deadline of registration for farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.