भोकरदन शहरात वापरलेला मास्क रस्त्यावरच पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:32 AM2021-04-23T04:32:33+5:302021-04-23T04:32:33+5:30
भोकरदन : कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. कापडी मास्क गरम पाण्याने धुऊन वाळवून घालणे आवश्यक आहे. तसेच ...
भोकरदन : कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. कापडी मास्क गरम पाण्याने धुऊन वाळवून घालणे आवश्यक आहे. तसेच ‘वापरा आाणि फेका’ या मास्कची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असते. परंतु, लोक मास्क खराब झाल्यास तो रस्त्यावर टाकून देत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्यासह इतर मोकाट जनावरांनाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच हे मास्क व सर्व कचरा जमा करण्यात पालिकाही कमी पडत असल्याचे दिसत आहे.
शहरातील कचरा पूर्णपणे जमा करण्यात पालिकेला अपयश येत आहे. त्यात ओला व सुका कचरा वेगळा करताना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच पालिका कचरा जमा करण्यात कमी पडत आहे, त्यातच नागरिकही गाफील राहत असल्याचे समोर आले आहे. वापरलेल्या मास्कची योग्य विल्हेवाट लावण्याऐवजी रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी अस्ताव्यस्त फेकले जात आहेत. मास्क खराब झाल्यास काय कामाचा? असे म्हणत ते मास्क फेकून देण्यात येत असल्याचे दिसते.
.........
मुख्याधिकाऱ्यांच्या प्रतिक्रियेसाठी जागा सोडणे....