१२ एकर उसासह मोसंबीची झाडे जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:21 AM2019-02-14T01:21:55+5:302019-02-14T01:22:20+5:30
घनसावंगी तालुक्यातीत खापर देव हिवरा येथे मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. त्यात ४ शेतकऱ्यांचा १२ एकर ऊस जळाला. यामुळे लाखोंचे नुकसान झाले. उसात तीन वर्षाची मोसंबीची झाडे होती, ती ४०० झाडेही या आगीत जळाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातीत खापर देव हिवरा येथे मंगळवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे उसाला आग लागली. त्यात ४ शेतकऱ्यांचा १२ एकर ऊस जळाला. यामुळे लाखोंचे नुकसान झाले. उसात तीन वर्षाची मोसंबीची झाडे होती, ती ४०० झाडेही या आगीत जळाली आहेत.
खापरदेव हिवरा येथील भायगव्हाण रस्त्यावरील ऊसात मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्र्किट होऊन आग लागली. यात रामू झाकणे यांचा ४ एकर, शिवा झाकणे यांचा ४ एकर, पिराजी झाकणे यांचा २ एकर तर सर्जेराव झाकणे यांचा २ एकर असा एकूण १२ एकर ऊस जळाला असून, कारखाना टनाला ३०० रुपये प्रमाणे कमी पैसे देतो. त्यामुळे अंदाजे २५ हजार रुपये एकरी नुकसान याप्रमाणे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. रामू झाकणे यांची उसातील मोसंबीची ४०० झाडे या आगीत जळाली. आग विझविल्याने ३२ एकर ऊस आगीपासून वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.