मुनोत हल्ला प्रकरण; चौघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 01:13 AM2019-12-04T01:13:03+5:302019-12-04T01:13:39+5:30
गौतम मुनोत यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाला होता. त्यावेळी देखील गावठी पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याचे पुढे आले असून, यातील चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुलै महिन्यात येथील बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाला होता. त्यावेळी देखील गावठी पिस्तुलाचा वापर करण्यात आल्याचे पुढे आले असून, यातील चार संशयितांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणामुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जालन्यातील व्यापारी सिंघवी यांच्यावर पंधरा दिवसांपूर्वी एका गावठी बंदुकीतून गोळीबार करून त्यांना जखमी करण्यात आले होते. त्यात परतूर येथील प्रतिष्ठित व्यापारी राजेश नहार यांच्यासह अन्य तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या अटकेतील आरोपींची कसून चौकशी केली असता, गौतम मुनोत यांच्या घरावर मध्यरात्री दोन वाजता अचानक हल्ला करण्यात आला होता हे उघड झाले आहे. यावेळी देखील गावठी पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता काय, या दृष्टीने आता तपास सुरू आहे. हा हल्ला देखील अटकेत असलेल्या नहार तसेच त्याच्या साथीदाराने घडवून आणला आहे काय, याची चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, जालन्यातील सिंघवी हल्ला प्रकरण शमते न शमते तोच मुनोत प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मुनोत आणि नहार हे काही वर्षापूर्वी व्यावसायिक भागीदार होते. त्यामुळे राजेश नहार आणि मुनोत यांच्यातही काही पैशांची देवाण-घेवाण ही होतच होती. त्यातूनच मुनोत यांच्या थेट घरावर हल्ला झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे,