‘त्या’ युवतीचा घराशेजारी राहणाऱ्या युवकाने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:25 AM2019-12-26T01:25:42+5:302019-12-26T01:26:07+5:30

प्रेमप्रकरण समजल्याने बायको सोडून गेली आणि प्रियसीनेही लग्न केले. त्यामुळे संतप्त झालेल्या एका युवकाने तिला व एका युवकाला अद्दल घडविण्यासाठी ‘त्या’ युवतीचा खून केल्याचे चंदनझिरा पोलिसांच्या तपासात समोर आले

Murder of young woman by ex-boyfriend | ‘त्या’ युवतीचा घराशेजारी राहणाऱ्या युवकाने केला खून

‘त्या’ युवतीचा घराशेजारी राहणाऱ्या युवकाने केला खून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रेमप्रकरण समजल्याने बायको सोडून गेली आणि प्रियसीनेही लग्न केले. त्यामुळे संतप्त झालेल्या एका युवकाने तिला व एका युवकाला अद्दल घडविण्यासाठी ‘त्या’ युवतीचा खून केल्याचे चंदनझिरा पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, आरोपीने त्या युवतीला आईस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने बोलावून घेत इंदेवाडी येथील मित्राच्या घरी नेऊन तिचा खून केल्याचेही समोर आले आहे.
जालना शहरातील आयकर विभागाच्या कार्यालयामागील दरेगाव रोड असलेल्या रेल्वे पटरीवर २१ डिसेंबर रोजी दीपाली शेंडगे या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी प्रारंभी संशयित आरोपी अविनाश वंजारे (रा.परतूर) याला ताब्यात घेतले होते. मात्र, तपासाला दिशा मिळत नव्हती. त्या युवतीच्या घराशेजारी राहणारा सचिन गायकवाड याचे त्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते घटनेनंतर तो म्हाडा कॉलनी भागात दिसून आला नाही, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
पोलिसांनी तपास करून सचिन गायकवाड याला तांत्रिक पुराव्याच्या आधारे ताब्यात घेऊन चौकशी केली. या चौकशीत सचिन गायकवाड याने आपणच दीपाली हिला आईस्क्रीम खाण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले होते. त्यानंतर इंदेवाडी येथील एका मित्राच्या घरी कोणी नसल्याने तिला तेथे नेले.
त्यावेळी दीपाली हिने ‘आता माझे लग्न झाले आहे. यानंतर मी तुला भेटणार नाही’ असे सांगून तिचे व अविनाश वंजारे यांनी लग्न करतानाचे फोटो दाखविले होते.
तिच्यामुळे बायको एक वर्षापूर्वी सोडून गेली. तिने लग्न करून धोका दिल्याने राग अनावर झाल्याने तिचा खून करून आपणच बनाव केल्याची कबुली सचिन गायकवाड याने दिल्याची माहिती चंदनझिरा पोलिसांनी दिली.
ही कामगिरी पोेलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. शामसुंदर कौठाळे, फौजदार प्रमोद बोंडले, सुनील इंगळे, पोकॉ नंदलाल ठाकूर, कर्मचारी सतवण, अनिल काळे, अजय फोके, गोविंद पवार, महिला कर्मचारी श्रध्दा गायकवाड यांच्या पथकाने केली.
स्वत:च टाईप केला मेसेज
आरोपीने दीपालीचा खून केल्यानंतर रात्रीच्या सुमारास तिचा मृतदेह तिच्याच स्कूटीवर ओढणीने बांधून ठेवला. तिचा मृतदेह आयकर भवनाच्या पाठीमागे असलेल्या रेल्वे पटरीवर आणून टाकला.
तेथे तिच्या मोबाईलवरून तिच्या संपर्क क्रमांकावर तिच्या लग्नाचे फोटो टाकले. तसेच सुसाईट नोटही टाईप करून टाकल्याची कबुली सचिन गायकवाड याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपीचा
बनाव फसला
अविनाश वंजारे याच्या त्रासाला कंटाळून दीपाली हिने आत्महत्या केल्याचा सर्वांचा समज होईल आणि अविनाश याला शिक्षा होईल, असा कायास लावून आरोपीने बनाव रचला होता. मात्र, चंदनझिरा पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा छडा लावून आरोपी सचिन गायकवाड याचा बनाव उघडकीस आणला आहे.

Web Title: Murder of young woman by ex-boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.