सिल्लोडला जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम नगरपंचायतने रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:56 AM2018-10-03T00:56:43+5:302018-10-03T00:58:13+5:30

जाफराबाद येथील खडकपूर्णा धरणातून सिल्लोड शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी जाफराबाद नगरपंचातीने यावर आक्षेप घेत खोदकाम करण्यास विरोध केला

Nagar Panchayat stopped the work of water supply scheme for Sillod | सिल्लोडला जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम नगरपंचायतने रोखले

सिल्लोडला जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम नगरपंचायतने रोखले

Next

जाफराबाद : जाफराबाद येथील खडकपूर्णा धरणातून सिल्लोड शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्यात येत आहे. यासाठी मंगळवारी जाफराबाद नगरपंचातीने यावर आक्षेप घेत खोदकाम करण्यास विरोध केला. खडकपूर्णा धरणातून सिल्लोडसाठी होत असलेल्या या पाणीपुरवठा योजने मधून जाफराबाद शहराला दोन एम.एल.डी. पाणी देण्यात यावे, अशी मागणी करत काम बंद पाडले.
नगर पंचायत हद्दीत पाणी पुरवठा योजनेच्या खोदकामाला मंगळवारी सकाळी सुरुवात झाली असताना नगर पंचायत पदाधिका-यांनी एकत्र येत पाणीपुरवठा योजनेचे खोदकाम करण्यास विरोध दर्शवत काम बंद केले आहे. विशेष म्हणजे खोद कामाला सुरुवात करताना नगर पंचायतची कुठल्याही परवानगी अथवा ना हरकत प्रमाणपत्र
न घेता खोदकामाला सुरुवात केली होती.
पाणीपुरवठा योजना शासनाकडून मंजूर करताना या योजनेतून जाफराबाद,भोकरदन या गावांचा विचार करण्यात येईल असे असे त्या वेळी सांगण्यात आले होते. मात्र तसे न होता जाफराबाद नगर पंचायतीने वेळोवेळी जिल्हाधिका-यांकडे मागणी करूनही हातात काही मिळत नसल्याने जो पर्यंत पाणीपुरवठा योजनेतून जाफराबाद शहराचा विचार होत नाही.तो पर्यंत पाणीपुरवठा योजनेचे खोदकाम होणार नाही. पवित्रा घेतला जाणार आहे असे पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.
यावेळी उपनगर अध्यक्ष मुजीब शेख, सभापती फारुख कुरेशी, नगरसेवक सऊद शेख, प्रकाश दिवटे, बाळू हिवाळे, अशपाक शेख, तैजीब पठाण, लक्ष्मण शेवाळे,अ‍ॅड विनोद दिगे,रमेश चव्हाण,अजीम शेख, विशाल वाकडे उपस्थित होते.

Web Title: Nagar Panchayat stopped the work of water supply scheme for Sillod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.