लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन व जाफराबाद तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरसकट हेक्टरी ५० हजार रूपयांचे अनुदान द्यावे, यासह इतर विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनामार्फत देण्यात आले.परतीच्या पावसाने सोयाबीन, मका, कापूस, ज्वारी, बाजरी, तूर, दाळींब, आद्रक आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना मदत द्यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने भोकरदन येथील उपविभागीय अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सरसकट कर्जमाफी द्यावी, हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे रबी हंगामासाठी मोफत बियाणे व खत वाटप करावे, सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता द्यावा, खराब झालेल्या रस्त्यासह बंधाऱ्यांची कामे करावीत, श्रावण बाळ संजय गांधी निराधार लाभार्थ्यांच्या मदतीत वाढ करावी, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राहूल देशमुख यांच्या वरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत आदी विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या.मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी यांना देण्यात आले. यावेळी राजाभाऊ देशमुख, रमेश सपकाळ, त्र्यंबक पाबळे, लक्ष्मण ठोंबरे, अशोक पवार, प्रा.अंकुश जाधव, प्रा. नईम कादरी, रामेश्वर जंजाळ, रामदास रोडे, कदीर शेख, नसीम पठाण, पुंजाराम साबळे, इश्वर पांडे, सोपान सपकाळ, रमेश बरडे, अंबादास दसपुते, रघुनाथ पांडे, शे.हक्कानी, बापू पाटील, शंकर गिरणारे, अमोल कुदर, किशोर शिंदे, जयंत जोशी, शे.नय्युम, शे.रईस यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भोकरदनमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 12:39 AM