डिजिटल शिक्षण काळाची गरज -येवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:45 AM2019-12-18T00:45:58+5:302019-12-18T00:46:44+5:30

प्रत्येक तासिकेचे रेकॉर्डीग करुन प्राध्यापकांवर एकप्रकारे निगराणी ठेवली जाणार असल्याने प्राध्यापकानी ती तयारी ठेवावी असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केले.

The need for digital learning time | डिजिटल शिक्षण काळाची गरज -येवले

डिजिटल शिक्षण काळाची गरज -येवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आजचे युग हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जाते. या युगात डिजिटल शिक्षण पध्दती विकसित होत आहे. ही विकसित होणारी पध्दत काळानुरुप विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने लक्षात घेऊन त्यानुसार पावले टाकावी आता महाविद्यालयामध्ये प्रत्येक तासिकेचे रेकॉर्डीग करुन प्राध्यापकांवर एकप्रकारे निगराणी ठेवली जाणार असल्याने प्राध्यापकानी ती तयारी ठेवावी असे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी केले.
जेईएस महाविद्यालयात मंगळवारी सायंकाळी हीरक महोत्सव विशेषांकाचे प्रकाशन कुलगुरु येवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक राजेंद्र बारवाले, अ‍ॅड. दिनायर जालनावाला, शिक्षणतज्ज्ञ प्रीती अग्रवाल, जेईएसचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव रामनिवास भक्कड, प्राचार्य जवाहर काबरा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना कुलगुरु येवले म्हणाले की, मराठवाडा विद्यापीठाने अनेक काळानुरुप बदल केले आहे. विद्यापीठांमधून केवळ पदवी प्रदान करण्याचे काम न राहता नवनवीन संकल्पनांवर काम करुन त्यातून उच्च शिक्षित विद्यार्थी घडविली पाहिजे परंतु तसे होत नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. आपण कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक चांगले बदल केले आहे. मराठवाडा विद्यापीठाबद्दलचा गैरसमज हळूहळू दूर होत असल्याचे ते म्हणाले. भविष्यात पीएचडी प्राप्त प्राध्यापकांना रिसोर्स पर्सनऐवजी केवळ पीएचडी पदवीधारक म्हणून संबोधले जाणार आहे. आज हजारो पीएचडीधारक आहेत परंतु त्यांनी सादर केलेल्या संशोधन प्रबंधांचा समाजासाठी कुठला उपयोग होतो, याचे आत्मचिंतन करण्याची गरजही त्यांनी वर्तविली.
एकीकडे बेरोजगारी वाढत असतानाच दुसरीकडे बहुराष्ट्रीय कंपन्यांना पात्र उमेदवार मिळत नाही. केवळ ७ टक्के पदवीधरांनाच रोजगार मिळत आहे. 
जेईएस महाविद्यालयबद्दल आपण पूर्वीपासून एक दर्जेदार आणि काळानुरुप शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून ओळखतो विद्यापीठांवर अंवलबून न राहता आता या महाविद्यालयाच्या व्यवस्थापन आणि प्राध्यापकांनी आॅटोनॉमसची तयारी करुन प्रस्ताव पाठवावा आपण त्यासाठी प्रयत्न करु असे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी नमूद केले.

 

Web Title: The need for digital learning time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.