जालन्यात गुन्हे प्रलंबित ठेवलेल्या ५९ पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:32 PM2018-12-27T20:32:05+5:302018-12-27T20:32:51+5:30

या पोलिस कर्मचाऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून गुन्हे प्रलंबित ठेवले आहेत

Notice to 59 police in Jalna doe to pending criminal cases | जालन्यात गुन्हे प्रलंबित ठेवलेल्या ५९ पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस

जालन्यात गुन्हे प्रलंबित ठेवलेल्या ५९ पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस

Next

जालना : मागील सहा महिन्यांपासून गुन्हे प्रलंबित ठेवलेल्या जिल्ह्यातील ५९ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गुरुवारी कारणे दाखवा नोटीस बजावल्या. यासोबतच येत्या दोन दिवसात नोटीसवर  लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत अवैध गुन्ह्यांच्याबाबत अनियमितता केल्याने त्या-त्या परिसरात अवैध धंदे बोकाळले आहेत. यामुळे संबंधीत पोलिस ठाण्यांच्या दहा पोलिस निरीक्षकांचा अहवाल आयजींना, तर आठ सहायक पोलिस निरीक्षकांना एसपींनी कारणे दाखवा नोटीसा दिल्या आहेत. दरम्यान, गुरुवारी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलिस ठाण्यांच्या ज्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून गुन्हे प्रलंबित ठेवले आहे. अशा ५९ पोलिस कर्मचाऱ्यांनाही नोटीसा देऊन दोन दिवसात अहवाल सादर करण्याचा अल्टीमेटम  दिल्याने पोलिस प्रशासकीय विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

जिल्ह्यात गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोकेवर काढले आहे. चालू वर्षात तब्बल ४ हजारांच्या जवळपास गुन्हे घडले आहेत. विशेष करुन त्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळलेले असतांनाही पोलिस निरीक्षकांसह सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस हेड कॉन्स्टेबल, बीट अंमलदार, कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे अवैध धंदे वाढून जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. अवैध दारु विक्री, रस्त्यातच धिंगाणा घालणे, अवैध वाहतूक, वाळू उपसा अशी अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कारवाईस सुरुवात केली आहे. दारु अड्डे, जुगार, मटका आदी अवैध धंदे सर्रास चालू असतात. या गुन्ह्यांवर पोलिस अधिक्षक एस. चैतन्य यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक समाधान पवार यांचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, विशेष कृती दलाचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांची पथके संबंधीत घटनास्थळावर जाऊन कारवाई करत आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

Web Title: Notice to 59 police in Jalna doe to pending criminal cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.