लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह इतर जिल्ह्यांतून मोटरसायकली चोरणाऱ्या एकास एडीएसच्या पथकाने बुधवारी कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चार मोटर सायकल जप्त केल्या. अशोक तरकसे (रा. कन्हैयानगर) असे आरोपीचे नाव आहे.२५ फेब्रुवारी रोजी घायाळनगर येथील अमोल बाबासाहेब अंभुरे यांची दुचाकी क्रमांक एम. एच. २१ बी.ए. २६७८ दुचाकी घरासमोर कोणीतरी चोरुन नेली होती. तरकसे यांच्या फिर्यादीवरुनकदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एडीएस प्रमुख यशवंत जाधव यांना खब-यामार्फत माहिती मिळाली की घायाळ नगर येथून चोरी गेलेली दुचाकी कन्हैयानगर येथील अशोक तरकसे याने चोरल्याची माहिती मिळताच एडीएसच्या पथकाने त्याला कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस खाक्या दाखवताच जालना शहरासह बीड जिल्ह्यातील परळी येथून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी तरकसे याच्याकडून चार वाहने जप्त केली.पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, पोहेकॉ नंदकिशोर कामे, संदीप चिंचोले, दीपक अंभारे यांनी ही कामगिरी पार पाडली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलीस चोरट्यांचा शोधही घेत आहेत.
चोरीच्या चार दुचाकींसह एक जण जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:43 AM