आष्टीत ‘एनआरसी’ विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 12:49 AM2019-12-17T00:49:21+5:302019-12-17T00:49:39+5:30

भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांत नुकत्याच मंजूर झालेल्या एनआरसी व कॅब च्या निषेधार्थ आष्टी येथे मुस्लिम समाजबांधव व संविधान प्रेमींच्या वतीने सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला

Opposed to 'NRC' | आष्टीत ‘एनआरसी’ विरोधात मोर्चा

आष्टीत ‘एनआरसी’ विरोधात मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांत नुकत्याच मंजूर झालेल्या एनआरसी व कॅब च्या निषेधार्थ आष्टी येथे मुस्लिम समाजबांधव व संविधान प्रेमींच्या वतीने सोमवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी एस. बी. बांगर यांच्यामार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.
भारताच्या शेजारील पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान येथून भारतात शरणार्थी म्हणून वास्तव्यास येणाऱ्यांना धार्मिक आधारावर दिले जाणारे नागरिकत्व हे भेदभावाने प्रेरित असेल, असे निवेदनात म्हटले आहे. या कायद्याला विरोध करीत तो रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अबजोलोदीन काजी, मुफ्ती म. अलिम, हाफेज महमद, हाफेज यकीन मेमार, हाफेज इरफान, मौलाना शफी, मौलाना सुभानी, मौलाना मतीन, मौलाना अदिल, मौलाना फेरोज, हाजी रहेमत खॉ पठाण, हाजी गु. रब्बानी कल्याणकर, आष्टी येथील सरपंच सादेक जहागीरदार, काºहाळाचे सरपंच मनोज सोळ्ंके, वसीम जमीनदार, भगवान कांबळे, गौतम शेळके, गौतम मस्के, संतोष रोहिमल, बाबासाहेब बागल, मुतुजा खाटीक, सत्तार कुरेशी, फेरोज बागवान, वसीम बागवान साबेर मणियार, जावेद टेलर, सुलतान टेलर यांच्यासह मुस्लिम समाजबांधव, संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Web Title: Opposed to 'NRC'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.